यावल ( सुरेश पाटील ) यावल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जी.डी.कुलकर्णी व उपशिक्षक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी विविध उपक्रमातून अनेक ठिकाणी कौतुकास्पद आणि लक्षवेधी मतदार जागृती अभियान राबविल्याने त्यांचा प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.[ads id="ads1"]
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे साहेब,जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम झाले.यात आज प्रांताधिकारी बबनराव काकडे साहेब यांच्या हस्ते रावेर विधानसभा मतदानसंघाचे सेलेब्रिटी डॉ.नरेंद्र महाले व मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.[ads id="ads2"]
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ झाल्या,यात यावल रावेर तालुक्यामध्ये प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत जोमाने केले गेले.यामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाची जागृती करत असताना ठीक ठिकाणी मतदानाच्या संदर्भात प्रबोधन केले करणारे,प्रत्येक मतदार व त्याच्या कर्तव्या विषयी त्याला जाणीव करून दिली.मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष गाण्यांच्या, पथनाट्य माध्यमातून, किर्तन इत्यादी माध्यमातून प्रबोधनाचे लक्षवेधी कार्य जनजागृती करण्यात आली. यावल बसस्थानक परिसरामध्ये सुद्धा प्रबोधनाचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने झाले.
यामध्ये यावल तालुक्याचे मतदान प्रबोधन सेलिब्रिटी म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने डॉ.नरेंद्र महाले यांनी प्रबोधनाचे कार्य केले.
त्यांच्यासोबत सरस्वती विद्या मंदिर यावल चे मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी सर हे सुद्धा प्रबोधनात सहभागी होते रावेर विधानसभा,मतदार संघामध्ये भरघोस मतदान होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके साहेब यांचे मोठे मार्गदर्शन आणि योगदान लाभले. लोकशाहीचे महत्त्वाचे दान म्हणजे मतदान हे करण्यासाठी प्रबोधनाचे समाजसेवेचे काम रावेर विधानसभा मतदारसंघात अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने केले. यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील शिक्षकांच्या पुढाकाराने सामाजिक कार्याची जाणीव जागृती झाली.
( डॉ नरेंद्र महाले,उपशिक्षक- जनजागृतीचे कार्यरत असतांना आमच्या व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य लाभले.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,बी.डी.ओ. डॉ.मंजुश्री गायकवाड व गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.