रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी ठीक बारा वाजेच्या दरम्यान रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती,हॉल मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुद्देशीय संस्था, ऐनपुर यांच्या वतीने जवळपास 50-60 गोर गरिबांना, दिव्यांगांना मान्यवरांच्या उपस्थितीत थंडीचे दिवस असल्यामुळे शाल,चादर चे वाटप करण्यात आले.यावेळी मोठया संख्येने डिव्यांग बांधव उपस्थित होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाला रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी केझो मॅडम, वानखेडे सर,रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, रावेर नगर पालिकेचे निलेश महाजन,सुरेश चिंधू पाटील,सोपान बाबुराव पाटील यांच्या सह सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.[ads id="ads2"]
कार्यक्रम यशस्वीते साठी आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश अरुण सैमिरे,उपाध्यक्ष जगदीश भाऊ मानकर, सचिव जितेंद्र भाऊ कोळी, सहसचिव शेख कामील शेख रऊफ,खजिनदार सुनील भाऊ काकडे,सदस्य फकीरा पाटील ,सदस्य रवींद्र कोळी,सदस्य सुनील परदेशी,सदस्य राहुल यादव,घनश्याम हरणकार,रजनीकांत बारी,पंढरी भाऊ पाटील,राजू तडवी यांनी परिश्रम घेतले.