पक्ष विरोधी वर्तनाबद्दल माजी रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांची वंचित बहुजन आघाडीतून हकालपट्टी

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील या अधिकृत उमेदवार आहेत. रावेर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. [ads id="ads1"]

 महाविकास आघाडीतील कॉग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष चौधरी यांना वंचित बहुजन आघाडीचे बाळू शिरतुरे, माजी तालुकाध्यक्ष रावेर यांनी पाठिंबा जाहीर केल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या चुकीच्या व निराधार आहेत. बाळू शिरतुरे व अन्य कोणालाही पाठींबा देण्याचा अधिकार नाही. रावेर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या शमिभा पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना बाळू शिरतुरे, माजी तालुकाध्यक्ष रावेर यांनी पक्ष विरोधी वर्तन केले आहे.[ads id="ads2"]

पक्ष विरोधी वर्तनाबद्दल बाळू शिरतुरे यांची वंचित बहुजन आघाडीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याची रावेर विधानसभा मतदारसंघ व जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व जनतेने नोंद घ्यावी.अश्या आशयाचे पत्र वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकुर यांनी काढले आहे.



जाहिरात

 



Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️