ऐनपूर - येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने हे होते.प्रमुख पाहुणे रासेयो विभागीय समन्वयक डॉ.जे.पी.नेहेते हे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून रावेर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे व प्रा.सी.पी.गाढे हे होते. [ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ.डी.बी.पाटील यांनी केले. प्रमुख वक्ते डॉ.जी.आर.ढेंबरे यांनी आपल्या व्याख्यानात संगितले की,प्रत्येक भारतीय व्यक्तीने संविधान निर्मितीची प्रक्रिया नीटपणे समजून घेतली पाहिजे.संविधान आपल्याला अनेक हक्क देते तसेच संविधान आपल्याला कर्तव्याची जाणीव सुद्धा करून देते.भारतीय लोकशाही ही जगासाठी आदर्श आहे. [ads id="ads2"]
महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये संविधाना विषयीची जागरूकता निर्माण करणे हे आम्हा शिक्षकांचे काम आहे. समाजाला संविधानाचे महत्त्व सांगितले गेले पाहिजे.असे मत डाॅ जी आर ढेंबरे यांनी मांडले.
प्रा.सी.पी.गाढे यांनी आपल्या भाषणात संविधान निर्मितीची प्रक्रिया विशद केली.होते.यासंविधानामुळेच समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळाला.अशी भावना आपल्या भाषणातून प्रा सी पी गाढे यांनी मांडली. प्रा.एस.पी.उमरीवाड यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे सामुहिक वाचन करवून घेतले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संविधानामुळे आपली ओळख निर्माण झाली आहे. असे विचार व्यक्त केले.आभार प्रदर्शन प्रा एच एम बाविस्कर यांनी केले.
उपप्राचार्य डॉ.एस.एन.वैष्णव,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.रेखा पाटील,प्रा.डॉ.व्ही.एन.रामटेके, प्रा. डॉ एस बी पाटील, डॉ एस एन पाटील, डॉ महेन्द्र सोनवणे प्रा इंगळे डॉ.पी.आर.गवळी,प्रा.डॉ.संदीप सांळुके,प्रा.नरेंद्र मुळे,प्रा. अक्षय महाजन,प्रा.ज्ञानेश्वर कोळी,डॉ पी. आर. महाजन,प्रा प्रदिप तायडे,प्रा डॉ नीता वाणी आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग मार्फत आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डाॅ एस.बी.पाटील यांनी केले.भारतीय राज्यघटनेच्या जयघोषाने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.