नुतन गटविकास अधिकारी केझो मॅडम यांनी के-हाळे बु. उर्दू शाळेला दिली भेट!

सावदा ता.रावेर प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- रावेर पंचायत समिती येथे नव्याने रुजू झालेले गट विकास अधिकारी वेवतुला केझो मॅडम यांनी नुकतेच के-हाळे बु. बु.येथील जि.प.उर्दु शाळेला भेट दिली.तरी सर्व प्रथम याठिकाणी ग्रामपंचायत सदस्य ऐनूर बाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन केझो मॅडम यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.[ads id="ads1"]

याप्रसंगी के-हाळे बु.ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी एस.टी. पाटील,कर्मचारी व पदाधिकारी तडवी ऐनुरबाई,पोलिस पाटील सौ.वर्षा प्रवीण पाटील हे उपस्थित होते.तसेच केझो मॅडम,गविअ वानखेडे साहेब व इतर अधिकारी यांनी सदर उर्दू शाळेस भेट दिली असता गटविकास अधिकारी केझो मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांशी संवाद साधला.[ads id="ads2"]

   आणि येथील विद्यार्थ्यांची गुणवंता सह शाळेत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी बाबत त्यांनी येथील विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक सह शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी मुख्याध्यापक गौसखान हबीबुल्लाह खान,उपशिक्षक रफिक शेख,तडवी शकील खां,व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे तडवी तसलीम उपस्थित होते.

जाहिरात

 



Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️