रावेर - यावल विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

 


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 20/11/2024 रोजी ११ रावेर विधानसभा मतदार संघात मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडले. सुमारे १४९० कर्मचारी व ४५० पोलिस कर्मचारी, ६५ मायक्रो observer यांचे सहकार्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रात्री उशिरापर्यंत मतपेट्या जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे रीघ सुरू होती.  [ads id="ads1"] 

  मतदान पेटी व साहित्य जमा करण्यासाठी एकूण ३३ टेबल लावण्यात आले होते. साहित्य जमा झाल्यानंतर मतदान कर्मचारी यांना जेवणाची व्यवस्था प्रशासना मार्फत करण्यात आली होती. सर्व साहित्य  मतपेटी जमा करण्यात आले व त्यांना स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित जमा करण्यात आल्या,  यासाठी CRPF कर्मचारी, पोलिस यांचेत्यासाठी  त्रिस्तरीय संरक्षण देण्यात आले आहे. मतदान प्रक्रिया चा पुढील भाग  दिनांक 23 रोजी मतमोजणी साठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.  [ads id="ads2"] 

  मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल मांडण्यात आलेले असून मतमोजणीच्या एकूण 23 फेऱ्या होणार आहेत तसेच टपाली मतदानासाठी ७ टेबल मांडण्यात आलेले आहे मतमोजणीसाठी प्रति टेबल एक (१)पर्यवेक्षक सहा (६)सहकारी कर्मचारी तसेच एक (१)परिचर व एक(१) मायक्रो observer यांची नेमणूक करण्यात आलेली आहे 

रावेर येथे मतमोजणी ठिकाणाची पाहणी करून सूचना देतांना निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे सोबत सहा निवडणूक अधिकारी मोहनमाला नाझीरकर

  मतमोजणी सकाळी ८.००  वाजता सुरू होणार आहे.  दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे यासाठी संपूर्ण प्रशासन व कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी बबन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असून त्यासाठी तहसीलदार रावेर बंडू कापसे,तहसीलदार यावल मोहनमाला नाझीरकर निवडणूक नायब तहसीलदार किशोर पवार, आर. डी पाटील, तसेच निवासी नायब  तहसीलदार यावल,रावेर काम करत आहेत. तसेच मंडळ अधिकारी श्री विठोबा पाटील हे सर्व टेक्निकल कामकाज सांभाळत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️