बिबट्या आपल्यावर हल्ला करेल या भीतीने तरुणीचा विहिरीत पाय घसरल्याने तरुणीचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यातील घटना

 

चाळीसगाव :  शेतात कापूस वेचणीचे काम सुरु होते. कापूस वेचणी करत असताना दूर अंतरावर बिबट्‍या निदर्शनास दिसला. बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून तरुणी घराकडे धावत सुटली.मात्र घाबरलेली तरुणी पाय घसरुन विहिरीत पडली. यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. [ads id="ads1"] 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील तांबोळे शिवारात सदरची घटना घडली. ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात एकापाठोपाठ हल्ल्याच्या घटना घडून बिबटे पिंजऱ्यात अडकत असतानाही शेत शिवारांमध्ये (Leopard) बिबट्‍याचे दर्शन होत आहे. याच दरम्यान तांबोळा (ता. चाळीसगाव) शेतशिवारात देखील बिबट्याचे दर्शन झाले. [ads id="ads2"] 

तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या. तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी देखील होते. सकाळी दहाच्या सुमारास स्नेहल विजय पाटील (वय १८) ही तरुणी भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती. तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली. त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली. 

मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिचा अचानक पाय घससरला ती विहिरीत पडली. हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. पाटणा तांडा (ता. चाळीसगाव) येथील पट्‍टीचे पोहणारे कैलास चव्हाण याना बोलावून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️