यावल ( सुरेश पाटील ) सुरू असलेल्या आर्थिक वर्षात यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात घरपट्टी पाणीपट्टी भरण्याची मुदत २७ ऑक्टोबर २०२४ होती आणि आहे परंतु यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी करदात्यांना घरपट्टी,पाणीपट्टी भरण्यासाठी दिलेली बिले ही ६ नोव्हेंबर २०२४ दिल्याने करदात्यांनी २७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत घरपट्टी पाणीपट्टी कोणत्या नियमाने कुठे आणि कोणाजवळ भरावी याचा खुलासा यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी करायला पाहिजे. [ads id="ads1"]
यावल शहरातील करदात्यांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की आम्ही यावल शहरातील रहिवासी आहोत नगरपालिकेचे नियमित करत आहे यावर्षी घरपट्टी व पाणीपट्टीची बिले दिलेली आहेत ही बिले दि. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी मिळाली मात्र घरपट्टी पाणीपट्टी देयक मुदत दि. २७ ऑक्टोबर २०२४ होती, नगरपालिकेत कर भरण्यासाठी गेले असता करपट्टीचे बिले / देयके मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत भरत आहे म्हणून १ टक्के सूट मिळण्याऐवजी आम्हाला २ टक्के विलंब शुल्क आकारणी करण्यात येत आहे. आमची काही चूक नसताना दोन टक्के विलंब शुल्क कशासाठी आकारणी केली जाते. याची चौकशी आणि कारवाई यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी करून या कर्मचाऱ्यांनी विलंब लावून बिले वाटप केली त्यांच्या वेतनातून शुल्काची रक्कम कपात करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे. करदात्यांना जो मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आला त्याला जबाबदार कोण..? याची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.[ads id="ads12"]
दिलेल्या तक्रार अर्जावर जितेंद्र देशमुख,सुभाष चौधरी,दिलीप देशमुख,हिराबाई देशमुख,सुरेश चौधरी,श्रीकृष्ण महाजन,प्रशांत चौधरी,विजय चौधरी,किशोर बडगुजर यांच्यासह इतरांनी स्वाक्षरी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.