रावेरच्या व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल अग्रवाल यांची आत्महत्या

 

रावेरच्या व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल अग्रवाल यांची आत्महत्या

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील व्यापारी कन्हैय्यालाल अग्रवाल यांनी काही तरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 25 नोव्हेंबर रोजी  रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात(Raver Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. [ads id="ads1"] 

  सामजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध पदे भुषवलेले व रावेर येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल पुनमचंद अग्रवाल (वय ७०) यांनी रविवारी रात्री काहीतरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जळगाव येथे नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. [ads id="ads2"] 

  याबाबत आयुष अग्रवाल यांनी रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रावेर पोलीस ठाण्याचे (Raver Police Station) पो.हे.का. विष्णू भिल हे करीत आहेत.

हेही बातमी वाचा : महाराष्ट्र राज्याचे हे आहे 288 आमदार..पहा सर्वच विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

जाहिरात

 



Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️