रावेर विधानसभा मतदार संघातून "इतक्या" उमेदवारांची माघार तर " इतकेच" उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

 



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर विधानसभा (Raver Vidhansabha) मतदार संघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी होवू  घातलेल्या निवडणुकीसाठी आज  दिनांक 4 नोव्हेंबर रोजी माघारीची दुपारी तीन वाजता मुदत संपली. एकूण 14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. तर आता फक्त 9 उमेदवारच निवडणूक रिंगणात आहेत. माघारीनंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हाचे वाटप निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी जाहीर केले. यावेळी खर्च निरीक्षक रावेर तहसीलदार (Raver Tahsildar) बी ए कापसे, यावल तहसीलदार (Yawal Tahsildar) मोहनमाला नाझिरकर उपस्थित होते.[ads id="ads1"]

⏩काँग्रेस ची डोकेदुखी वाढणार

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रावेरचे नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यांच्या उमेदवारी कडे संपूर्ण रावेर मतदार संघाचे लक्ष लागून होते.अंतिम उमेदवारांची यादी यावेळी निवडणुक  अधिकारी बबनराव काकडे यांनी जाहीर केली. तसेच चिन्हाचे वाटप उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधिच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.[ads id="ads2"]

 निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात पक्ष व चिन्ह): 

शमीभा भानुदास पाटील (वंचित बहुजन आघाडी - गॅस सिलेंडर,अनिल छबीलदास चौधरी (प्रहार जनशक्ती बॅट), धनंजय शिरीष चौधरी ( काँग्रेस -हाताचा पंजा), अमोल हरिभाऊ जावळे (भाजप - कमळ), दारा मोहम्मद जाफर मोहम्मद (अपक्ष रिक्षा), नारायण हिरामण अडकमोल (बसपा हत्ती), खाल्लोबाई युनूस तडवी (ऑल इंडिया हिंदुस्थान पार्टी टीव्ही), आलीफ खालीफ शेख (अपक्ष रोडलोलर), मुस्ताक कमाल मुल्ला (अपक्ष किटली) असे उमेदवार रिंगणात आहे.

हेही वाचा : Ground Zero Report Jalgaon District: जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कुणाचे वर्चस्व, कुणाची भूमिका ठरणार महत्वाची?

हेही वाचा : भाऊबीजच्याच दिवशी रावेर तालुक्यातील "या" गावातील पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या

यांनी घेतली माघार :

शेवटच्या दिवशी माघार घेणाऱ्यांमध्ये सुरेश गुलाब बोदडे, उमा विठ्ठल भिल, संजय अर्जुन चौधरी, नुरा तडवी, धीरज अनिल चौधरी, नंदिनी अनिल चौधरी, अबाज फकिरा तडवी, वामनराव भालचंद्र जडे, गंगाराम महेंद्र बान्हे, दिवाकर वाणी, शोहिखान मुस्तफा तडवी, शेख कुर्बान शेख करीम, संजय हमीद तडवी, हर्षा अनिल चौधरी यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे.

हेही वाचा : Ground Zero Report Jalgaon District: जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कुणाचे वर्चस्व, कुणाची भूमिका ठरणार महत्वाची?

हेही वाचा : भाऊबीजच्याच दिवशी रावेर तालुक्यातील "या" गावातील पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या



जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️