रावेर तालुक्यातील धामोडी येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने मुक्ताईनगर विधानसभा उमेदवार चंद्रकांत भाऊ पाटील आणि रावेर विधानसभा उमेदवार अमोल भाऊ जावळे यांच्या विजयासाठी धामोडी ते ओंकारेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads1"]
धामोडी गावातून टाळ मृदुनगाच्या गजरात पायी दिंडी काढण्यात आली. वारकरी महिला सहभागी झाले. दिंडी रावेर येथे पोहोचताच भाजप कार्यालय येथे तालुकाध्यक्ष भाजप महेश चौधरी, भाजप तालुका सरचिटणीस दुर्गादास पाटील यांच्या वतीने मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.[ads id="ads2"]
त्यानंतर पुढे दिंडी ओंकारेश्वर येथे निघाली. महायुती विजयी व्हावी यासाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रावेर विधानसभा उमेदवार अमोल भाऊ जावळे तसेच मुक्ताईनगर विधानसभा उमेदवार चंद्रकांत भाऊ पाटील हे पुन्हा निवडून यावे यासाठी वारकरी संप्रदायाच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.