डायटच्या अधिव्याख्याता व रावेर यावल तालुका गटशिक्षण अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती
रावेर/यावल ( सुरेश पाटील )
जळगाव जिल्ह्यामधील रावेर व यावल तालुक्याच्या नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण हे रावेर तालुक्यातील सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुल या शाळेमध्ये सुरू झाले.मा. प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये सेवा प्रवेशोत्तर प्रेरणा उपक्रमांतर्गत नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. [ads id="ads1"]
यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेमध्ये नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.नवनियुक्त शिक्षकांमध्ये विविध शैक्षणिक कौशल्य व अध्ययन अध्यापन पद्धती मध्ये आलेले नवनवीन आयाम यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.यावल,रावेर तालुक्यातील नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षण समन्वयक म्हणून रावेर बीआरसीचे प्रफुल्ल मानकर हे काम बघत आहे.याप्रसंगी डाएट डायटच्या अधिव्याख्याता डॉ. कविता बोरसे यांची उपस्थिती होती.तसेच यावल तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके साहेब,रावेर तालुका गटशिक्षणाधिकारी विकास कोळी यांनी सुद्धा प्रशिक्षणाला भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले.यामध्ये सुलभक म्हणून संदीप मांडवकर,[ads id="ads2"]
गणेश पाटील,हर्षल पाटील,दीपक आमोदकर,दिपक सोनार व डॉ. नरेंद्र महाले हे म्हणून काम पाहत आहे.कार्यक्रमाचे प्रशिक्षणाची सुरुवात ही राष्ट्रगीत,प्रार्थना व परिपाठाने झाली.प्रशिक्षणाचा शेवट संध्याकाळी वंदे मातरम ने झाला.प्रशिक्षण हे दि ४ नोव्हेंबर २०२४ पासून ते ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत राहील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांनी केले तर,आभार प्रफ्फुल मानकर यांनी केले.