जळगाव :- शिक्षण , नोकरी , व्यवसाय या व अन्य कारणांनी संयुक्त कुटुंब व्यवस्था आता संपल्यात जमा आहे , विभक्त कुटुंब व्यवस्थेतही आई , वडील , भाऊ , बहीण वेगवेगळ्या गावी राहत असून विशिष्ट दिवशी ते विशिष्ट ठिकाणी एकत्र येतात असे आजचे चित्र असल्याने त्यातच जोडीदारा विषयी वाढत असलेल्या अपेक्षा यामुळे मुला मुलींचे विवाह लवकर जुळत नाही . सामाजिक , कौटुंबिक भान राहत नाही . तेंव्हा नियोजित वधू , वर यांनी फार अटी , शर्ती न बाळगता विवाह करावा , कौटुंबिक जिव्हाळा ठेवावा व विस्कळीत होत असलेली कुटुंब व्यवस्था विस्कळीत होणार नाही याचे भान ठेवावे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.[ads id="ads1"]
जळगाव येथील सैनिक सभागृहात आयोजित बौद्ध वधू वर परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. राजेश झालटे यांनी सांगितले की वधू , वर परिचय मेळावे घेणे , सामूहिक विवाह लावणे आज काळाची गरज आहे . मुला मुलींनी सामाजिक भान ठेऊन तसेच कौटुंबिक जबाबदारी ओळखून जबाबदार घटक म्हणून जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे .[ads id="ads2"]
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक चंद्रगुप्त सुरवाडे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की , आज अनुरूप जोडीदार मिळणे दूर राहिले आहे तर वधूच मिळणे कठीण झाले आहे . पर राज्यातील , पर जातीतील मुलगी मिळाली तरी चालेल असे सांगितले जाते . या गोष्टीचा गैरफायदा अनेक लोक घेवून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत .
वीर सावरकर रिक्षा युनियन चे अध्यक्ष दिलीप सपकाळे , ॲड. रेखा कोचुरे , ॲड. दिलीप भुरे यांचीही समायोचीत भाषणे झालीत .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभारप्रदर्शन अशोक तायडे यांनी केले .
सुरवातीस जयसिंग वाघ यांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता चंदा सुरवाडे , सविता तायडे , बाबुलाल सोनवणे, किर्ती साबळे , उषाबाई सोनवणे , कोमल गुरचळ, उज्वला सोनवणे, प्रतीक्षा साबळे , विजय गुराचळ, मनीष साबळे , राहुल सोनवणे, मिलिंद साबळे यांनी परिश्रम घेतले.
या मेळाव्यात १२५ मुला , मुलींनी परिचय करून दिला. मेळाव्यास जिल्हाभरातून लोक मोठ्यासंख्येने आले होते . मेळाव्यात अनेकांनी नोंदणी केली .