यावल ( सुरेश पाटील ) येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आज शनिवार दि.३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झाले यात ६३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.विज्ञान प्रदर्शन २ गटात भरवण्यात आले. त्यातील पहिला गट हा ६ वी ते ८ वी व दुसरा गट ९ वी ते १० वी साठी होता. [ads id="ads1"]
राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांच्या दिशानिर्देशांनुसार विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा निश्चित केला होता. सामाजिक पर्यावरणाला अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज घेऊन ७ उपविषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.अन्न आरोग्य व स्वच्छता, वाहतूक आणि दळणवळण,नैसर्गिक शेती,आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडलिंग आणि संगणकीय विचार,कचरा व्यवस्थापन,संसाधन व्यवस्थापन.[ads id="ads2"]
वरील विषयांवर विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारचे वैज्ञानिक दृष्टीने उत्तम असे वैज्ञानिक उपकरणे सादर केली त्याचबरोबर उत्तम सादरीकरण सुद्धा विद्यार्थ्यांनी केले या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संचालक तथा मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी यांनी भूषविले.आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगताना दैनंदिन जीवनातील अनेक घटनांमधील विज्ञान शिकत राहिले पाहिजे व त्यातून अनुभव समृद्ध झाले पाहिजे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या ठिकाणी संचालक बी.पी.वैद्य.प्रा एस.एम.जोशी,एन.डी.भारुडे,प्रा. बी.सी.ठाकूर,एस.बी,चंदनकार,एम. एम.गाजरे मॅडम,ए.बी.शिंदे,
नीलिमा पाटील मॅडम,भाऊसाहेब दीपक पाटील व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक ए.एस.सूर्यवंशी,डॉ.नरेंद्र महाले,एस.डी.चौधरी व शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले यांनी केले.तर आभार ए.एस.सूर्यवंशी यांनी मानले.
लहान गट
प्रथम हिमांशू बावीसे,द्वितीय जगदीश माळी व दुर्गेश चौधरी, तृतीय पूर्वेश झुरकाळे
मोठा गट
प्रथम यश बाविस्कर द्वितीय विजय महाजन तृतीय ज्ञानेश्वर बारी.(शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देत असताना वैज्ञानिक दृष्टीने विद्यार्थी शालेय स्तरावर उपक्रमशीलतेच्या माध्यमातून संधीच्या शोधात असतो आणि याच विचाराने दरवर्षी सातत्याने शालेय स्तरावर ती विज्ञान प्रदर्शन हे आयोजित केले जात असते आणि यातून विद्यार्थी स्वयंप्रेने सहभाग नोंदवतात )