भाऊबीजच्याच दिवशी रावेर तालुक्यातील "या" गावातील पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या

 

भाऊबीजच्याच दिवशी रावेर तालुक्यातील "या" गावातील पती पत्नीची गळफास घेत आत्महत्या

विवरे खुर्द ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : विट भट्ट्यावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवणाऱ्या दोघ पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास रावेर तालुक्यातील विवरे खुर्द (Vivare Khurd Tal Raver Dist Jalgaon) येथे घडली. या घटनेमुळे विवरे गावासह संपूर्ण रावेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.भाऊबीजच्या दिवशीच ही दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.[ads id="ads1"]

या बाबत सविस्तर वृत्त असे की  रावेर तालुक्यातील विवरे खुर्द (Vivare Khurd Tal Raver Dist Jalgaon) येथिल कुंभार वाडा येथे आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोघ पती पत्नीने आत्महत्या केली आहे. पती अनिल देविदास हरणकर (वय ४०) तर पत्नी शितल अनिल हरणकर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहे.दोघांना एक मुलगी व दोन मुले आहे.विटाच्या भट्ट्यावर काम करुन उदानिर्वाह करून  ते आपले कुटुंब चालवत होते.परंतू अचानक दोघांनी आज टोकाचे पाऊल उचलले.[ads id="ads2"]

   ते वास्तव्यास  असलेल्या विवरे खुर्द (Vivare Khurd Tal Raver Dist Jalgaon)  येथील कुंभार वाड्यात वरच्या रूम मध्ये दोघ पती-पत्नी यांनी लांब रुमालच्या साहाय्याने गळफास घेतली.ही घटना त्यांचा लहान मुलगा पाणी पिण्यासाठी वरच्या रूम मध्ये गेला असतांना समजली. यावेळी आजू-बाजू लोक जमा होऊन दोघांना रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : Ground Zero Report Jalgaon District: जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कुणाचे वर्चस्व, कुणाची भूमिका ठरणार महत्वाची?

रावेर तालुक्यातील विवरे खुर्द गावात प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते.यामुळे गरीब कुटुंबातील मुल व्यसनाधीन होत आहे. दारूमुळे अनेकांच्या संसारात क्लेश निर्माण होत असुन भांडन होत आहे. मयत अनिल याला देखिल दारूच व्यसन होते यातून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. असे गावातील नागरीकांनी आक्रोश करत ग्रामीण रुग्णालयात पत्रकारांना सांगितले.तरी निंभोरा पोलिसांनी दारू बंद चा बंदोबस्त करावा. अशी आर्त हाक जनसामान्य लोकांमधून ऐकावयास मिळत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️