रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन ग्रामपंचायत कार्यालय विटवे येथे उत्साहात साजरा करण्यात आला सर्व प्रथम विश्वरत्न महामानव,संविधान निर्माता डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण संविधानाचे पूजन लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी व माजी उपसरपंच सुरेश कोळी यांचे हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
या वेळी ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेडे यांनी उपस्थितांना संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी ग्रा. पं. सदस्य गणेश मनुरे, उपसरपंच, ईश्वर चौधरी, रोजगार सेवक, सिताराम वानखेड़े, पोलिस पाटील, बाळु पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील, नरेंद्र वानखेड़े, कैलास मनुरे आशा सेविका, संगीता वानखेड़े, नंदा चौधरी, शारदा पाटील व गावातील गावकरी, महिला उपस्थित होते