नरेंद्र मोदी आणि यांच्या नेतृत्वात आदिवासी भागात विकास पोहचला : अमोल जावळे

              



रावेर : रावेर विधानसभेतील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी आज सातपुड्यातील आदिवासी भागात भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात आदिवासी भागात झालेले विकासकामे मतदारांना सांगितली. अमोल जावळे यांनी मतदारांना आश्वस्त केले की, महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली आणखी विकासाच्या योजना राबवल्या जातील आणि आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहतील.[ads id="ads1"]

पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आदिवासींचा केवळ मतांसाठी उपयोग केला आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना सातपुड्यातील गाव-तांड्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत.[ads id="ads2"]

या सरकारने आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. गेल्या पन्नास वर्षांपूर्वी हिरवागार असलेला सातपुडा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीमुळे बोडका झाला. या भागात ज्यांनी मंत्रीपद भूषवले, त्यांच्या कार्यकाळात सातपुडा विकास मंडळाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान लाटले गेले, मात्र प्रत्यक्ष विकास झाला नाही.

गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारने आदिवासींसाठी अत्यंत प्रभावी योजना राबवल्या आहेत. मोफत धान्य, उज्ज्वला गॅस योजनेत गॅस कनेक्शन, शेती व उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज, हायमास्ट लॅम्प, शिक्षणाच्या सुविधा, आरोग्य सेवा, तसेच महिलांसाठी दरमहा ₹1500 इतका भत्ता अशा योजनांमुळे आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. या सर्व योजनांचा लाभ आदिवासींना त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचत असल्याचे अमोल जावळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सुरेश धनके, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, पी.के. महाजन, दिनेश पवार, साई राठोड, रोहन पवार, हरलाल पवार, सुरेश पवार, विनय पवार, अनिल पवार, जितू पवार, चरणसिंग पवार, देवसिंग पवार, गोपाळ नेमाड, सागर भारंबे, हरलाल कोळी, अहमद तडवी, जितू पाटील, मिलिंद नायकोडे, महेश पाटील, विजय महाजन, महेश चौधरी, चेतन पाटील, वासुदेव नरवाडे, श्रीकांत देशमुख, सुनील पाटील यांसह महायुतीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काँग्रेस महिला आघाडीच्या माजी तालुका अध्यक्षा आणि विवरे बुद्रुकच्या विद्यमान गट ग्रामपंचायत सदस्य लिलाधर पाचपांडे यांची सून मनीषा पाचपांडे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️