रावेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग....पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल 

रावेर तालुक्यातील ऐनपूर (Ainpur Tal Raver Dist Jalgaon) येथे  एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून त्याच्यावर  निंभोरा पोलीस स्टेशन  (Nimbhora Police Station) येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]

   सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील ऐनपूर (Ainpur Tal Raver Dist Jalgaon)येथील संशयित आरोपी विशाल सुरेश जैतकर हा राहत असलेल्या भागातच एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करुन शिवीगाळ तसेच तीला धमकी दिली यावरून अल्पवयीन मुलीच्या आई ने निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीत संशयीत आरोपी विशाल सुरेश जैतकर (वय 22 वर्ष) रा. ऐनपूर याने विनयभंग केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.[ads id="ads2"]

   त्या अन्वये संशयीत आरोपी विशाल सुरेश जैतकर विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.192/24 भा.न्या.स. कलम 74,78, 333, 115(2), 352,(2) सह पोस्को कायदा कलम 8 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीस अटक करून मा. न्यायालय भुसावळ येथे हजर केले आहे पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे  (Nimbhora Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे हे करीत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️