आठ वर्षीय चिमुकलीला गळफास देत आईनेही संपवली जीवनयात्रा : जळगाव जिल्ह्यातील दुःखद घटना


जळगाव शहरातून (Jalgaon  City) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहितेने ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. सोनाली दिपक दाभाडे (वय ३६) आणि तेजस्विनी दीपक दाभाडे (वय ८) असे मयत आई व मुलीचे नाव या घटनेनने परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नसून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanand Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

काय आहे घटना नेमकी?

जळगाव शहरातमधील हरिविठ्ठल नगर (Hari  Vitthal Nagar,Jalgaon) भागात सोनाली दाभाडे या पती दीपक दाभाडे आणि मुलगी तीन मजली इमारतीत दोन भावांसह वास्तव्याला होते. पती दीपक दाभाडे हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान पती आज २४ रोजी सकाळी भावांसह नातेवाईक वारल्यामुळे भुसावळ (Bhusawal ) येथे गेलेले होते.[ads id="ads2"] 

त्यांची पत्नी सोनाली दाभाडे व त्यांची मुलगी तेजस्विनी हे घरी एकटे होते. त्यांनी सकाळी ९ वाजेनंतर कधीतरी मुलीला एका स्कार्फने गळफास देऊन स्वतः सोनाली दाभाडे यांनी दुसऱ्या स्कार्फने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.दुपारी १२ वाजेच्या सुमारास पती दीपक दाभाडे व परिवार भुसावळ येथून घरी आले तेव्हा घटना उघड झाली. तिसऱ्या मजल्यावर पती गेले असता आतून दरवाजा लावून घेतलेला होता. तेव्हा दरवाजाला धक्का मारून आत गेल्यावर दोघांचे मृतदेह पाहताच पती दीपक यांचे अवसान गळून त्यांनी एकच हंबरडा फोडला.

हेही बातमी वाचा : महाराष्ट्र राज्याचे हे आहे 288 आमदार..पहा सर्वच विजयी उमेदवारांची यादी एका क्लिकवर

नातेवाईकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Civil Hospital Jalgaon) व रुग्णालयात दोघांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanand Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

जाहिरात

 



Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️