समाजकंटकांचा हिशोब घेऊन सामाजिक शांतता प्रस्थापित करणार : नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांची पहिली प्रतिक्रिया
यावल ( सुरेश पाटील ) विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात रावेर विधानसभा मतदारसंघात प्रथमच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी १ लाख १३ हजार ६७६ एवढे मतदान घेऊन ( ४३ हजार ५६२ मताधिक्य घेतल्याने ) काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय तरुण तडफदार उमेदवार धनंजय चौधरी यांचा पराभव केला.[ads id="ads1"]
समाजकंटकांचा हिशोब घेऊन सामाजिक शांतता प्रस्थापित करणार... अशी पहिली जाहीर प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी साप्ताहिक सुवर्ण दिप न्युज शी बोलताना व्यक्त केली आहे.
साप्ताहिक सुवर्ण दिप न्युज शी बोलताना ते पुढे म्हणाले की गेल्या ५ वर्षात मतदार संघातील बहुसंख्य नागरिक मनमानी कारभाराला कंटाळले होते, तसेच लाडक्या बहिणींनी भाऊ बहिणीचे पवित्र नाते जोपासल्याने त्यामुळे अविश्वसनीय असे मताधिक्य मला मिळाले आणि हा सज्जन शक्तीचा विजय आहे.[ads id="ads2"]
संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात सामाजिक शांतता निर्माण करण्यासाठी प्राधान्य देऊन समाजकंटकांचा हिशोब घेऊन प्रत्येक घटकाचा विकास करणार,प्रचारादरम्यान विरोधकांनी जो निरेटिव्ह प्रचार केला तो फेक निरेटिव्ह प्रचार होता आणि विरोधक यात माहेर होते आणि आहेत अशी सुद्धा प्रतिक्रिया सुद्धा अमोल जावळे यांनी व्यक्त केली.