शमिभा पाटील : दोन लाखांहून अधिक गायरान धारकांना मी न्याय दिलाय
रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : स्वतःला धर्मनिरपेक्ष, संवेदनशील समजणारे भाजपवाले, काँग्रेसवाले, परिवर्तन महाशक्तीवाले यांच्यातील काही चिल्ले पिल्ले वाड्या वस्त्यांत जाऊन प्रचार करत आहेत की, आता काय हिजड्याला निवडून देणार काय ? त्यांना माझे आवाहन आहे की, ही हिजडा मैदानात काय करू शकते ते तुम्हाला दाखवते असे वंचित बहुजन आघाडीच्या रावेर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शमिभा पाटील यांनी त्यांच्या प्रचार सभेत बोलताना म्हटले आहे.[ads id="ads1"]
शमिभा पाटील यांनी म्हटले की, आम्ही भावनिकतेचे राजकारण करत नाही, आम्ही दिशाभूल करून राजकारण करत नाही. समाजाचे प्रश्न, हक्क आणि अधिकार. इथल्या शोषित, वंचित घटकांचे हक्क आणि अधिकार टिकून राहिले पाहिजे यासाठीची लढाई लढण्यासाठी आम्ही राजकीय भूमिका घेत आहोत. इथले जे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांचे काही चिल्ले, पिल्ले सोडले आहेत. ते गावागावात अपप्रचाराच्या फैरी झाडत आहेत. महाराष्ट्रात 2 लाख 22 हजार 263 गायरानधारक लोकांना नोटीस आल्या होत्या त्यांना न्याय दिला या हिजड्याने दिलाय.[ads id="ads2"]
या वेळी त्यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, स्टार प्रचारक दिशा पिंकी शेख, तय्यब जफर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.