रावेर विधानसभा मतदार संघात सकारात्मक विचार व सेवेच्या माध्यमातून जनतेशी नाळ जुळलेली आहे. जनतेचा विश्वास चौधरी परिवारावर कायम राहीला आहे. प्रचार करतांना मतदारांची मिळणारी साथ, आशीर्वाद व उत्स्फूर्त पाठिंबा ही मोठी शक्ति आहे. याच शक्तीच्या बळावर आपला विजय निश्चित आहे असा विश्वास रावेर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी यांनी व्यक्त केला आहे. [ads id="ads1"]
रावेर मतदार संघात सध्या धनंजय चौधरी यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. या प्रचारात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असून प्रचार रॅली मतदारांच्या सहभागाने गर्दीने फुलून जात आहेत. रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी रावेर तालुक्यातील चोरवड येथून प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनंतर अजनाड, मोरगाव बुद्रुक, मोरगाव खुर्द, वाघोड, पुनखेडा, पातोंडी, निंभोरासिम, थेरोळा, धुरखेडा, बोहरडे, नांदूरखेडा, अजंदा या गावातील मतदारांच्या भेटी घेवून संवाद साधला. वाघोड येथे महिलांनी काढलेली पंजा निशाणीची रांगोळी लक्षवेधी ठरली. तर पातोंडीत प्रचारार्थ धनंजय चौधरी पोहचताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले. महर्षी वाल्मिक, संभाजी ब्रिगेड, अहिल्याबाई होळकर चौक, श्री राजे छत्रपती शिवाजी चौक प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रचारास सुरुवात करण्यात आली. गावातील महिलांनी धनंजय चौधरी यांचे औक्षण करीत विजयासाठी आशीर्वाद दिले. वाघोड येथे श्री कुवर स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशदारास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जय ज्योती- जय क्रांती, श्री कुवरस्वामी महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आशा घोषणांनी वाघोड गाव दणाणून निघाले.[ads id="ads2"]
ठीकठिकाणी महिलांनी उमेदवार धनंजय चौधरी यांचे औक्षण करीत विजयाचा आशीर्वाद दिला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, प्रकाश मुजुमदार, माजी नगरसेवक एड योगेश गजरे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख योगिराज पाटील, राजीव सवरणे, गणेश बाजीराव पाटील, विनायक महाजन, डी एस चौधरी, डॉ. सुरेश पाटील खानापूर, यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, प्रकाश मुजुमदार, माजी नगरसेवक एड योगेश गजरे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा उपप्रमुख योगिराज पाटील, राजीव सवरणे, गणेश बाजीराव पाटील, विनायक महाजन, डी एस चौधरी, वाघोडचे सरपंच संजीव मशाने, गुणवंत सातव, के. एम. महाजन, राहुल पाटील, गणेश बोरणारे, सुनील सातव, दिनकर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मोरगाव खुर्द येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावातून प्रचारास सुरुवात केली. मोरगाव बुद्रुक येथे उमेदवार धनंजय चौधरी यांचे छाया पाटील, मीना पाटील यांनी औक्षण केले. यावेळी माजी सरपंच अलका पाटील, काँग्रेसचे जेस्ट कार्यकर्ते लक्ष्मण रामू पाटील, शिवदास हिरामण पाटील, रतन सुरसिंग पाटील, जितेंद्र लक्ष्मण पाटील, अनिल माधव पाटील, भीमराव अर्जुन ढिवरे, किरण ढिवरे, सुमेरसिंग पाटील, रवींद्र नामदेव पाटील, बाळू ढीवरे, सुधाकर पाटील, मोरगाव खुर्दचे सरपंच जे आर पाटील, डॉ. पी जी पाटील, कैलास पाटील, हिरामण पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, सदस्य आत्माराम रामचंद्र पाटील, साहेबराव चौधरी, गोपाळ रामचंद्र पाटील पातोंडीत सरपंच समाधान कोळी, सुरेश मधुकर सावळे, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, लखन पाटील, प्रवीण पाटील, आशु पाटील, आर्यन पाटील, सचिन कोळी, यशवंत महाजन, घनश्याम पाटील पुनखेडा येथील चंद्रकांत पाटील, समाधान दिनकर पाटील, वसंत बाजीराव पाटील, लिलाचंद नाना पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते.