रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे दिनांक 16 नोव्हेंबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्कूल च्या प्रिन्सिपल सुचिता पाटील यांच्या संकल्पनेतून बाल दिवस निमित्ताने बाल मेला चे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्कूल चे प्रिन्सिपल सुचिता पाटील यांच्या हस्ते फित कापून बाल मेळाचे उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी नी घरूनच बनवून आणलेल्या पदार्थ गुलाबजाम, पाणी पुरी, भेळ, केक, आदी पदार्थांचे तसेच खेळाच्या वस्तू अशा एकूण साठ टेबल लावून आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून जवळपास ६०-६५ स्टॉल लावण्यात आले होते. या बाल मेला ला विद्यार्थी विद्याथींनी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाण्याचे पदार्थ विकत घेत विद्यार्थी विद्यार्थी नी तसेच पालक यांनी आस्वाद घेतला.[ads id="ads2"]
शाळेतील विद्यार्थी यांना लहानपणापासून च आर्थिक देवाणघेवाण व्यवहार चे ज्ञान यावे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या वेळी स्कूल च्या प्रिन्सिपल सुचिता पाटील यांनी सुवर्ण दिप न्यूज शी बोलताना सांगितले. यावेळी कार्यक्रम आयोजनासाठी शाळेतील प्रिन्सिपल तथा शिक्षक शिक्षिका तसेच कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.