यावल शहरात पाचशे रूपयाच्या बनावट नोटा चलनात आणि बोगस निकृष्ट प्रतीच्या कामांकडे लोकप्रतिनिधीसह शासनाचे दुर्लक्ष : दोन जणाना पोलीसांनी घेतले ताब्यात



यावल ( सुरेश पाटील )

काल बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी यावल शहरातील एका बियरच्या दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या ४ ग्राहकांकडून बिलापोटी ५०० रुपयाची बनावट नोट चलनात येत असल्याचे लक्षात आल्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ जणांना दुकानदारांने यावल पोलिसांच्या ताब्यात दिले, तर यातील दोनजण सिनेमा स्टाईल पद्धतीने दुचाकीवरून पसार झाल्याची घटना घडली.हा काही नवीन विषय नाही मागील महिन्यात बनावट नोटा प्रकरणात यावल शहरातूनच आरोपी पकडले गेले आहे त्याचे पुढे काय झाले..? याचप्रमाणे यावल शहरात लोकप्रतिनिधीच्या काही जवळच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची बोगस आणि निकृष्ट प्रतीची कामे करून तसेच काही लाखो रुपयांची कामे फक्त कागदोपत्री दाखवून शासनाचा निधी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी हडप केला असल्याची तक्रार सुद्धा शासन दरबारी दाखला आहे. [ads id="ads1"]

       लोकप्रतिनिधीने शिफारस केल्यानुसार शासनाने नगरपालिका मार्फत पूर्ण वशिष्ठ पूर्ण योजना सन २०२२ मध्ये राबवली होती आणि आहे या योजनेत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ३ ते ४  रस्ते कागदोपत्री दाखवून एका   लोकप्रतिनिधीच्या प्रभावाखाली १५ ते २० लाख रुपयांचा निधी हडप केला असल्याची जोरदार चर्चा आहे

यात मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे यांनी गेल्या वर्षी लेखी तक्रार केल्यावर सुद्धा चौकशी गुलदस्त्यात अडकली आहे. चौकशी का आणि कोणाच्या प्रभावामुळे झाली नाही हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारे गेल्या दहा ते पंधरा वर्षात यावल नगरपालिकेत १५ ते २० कोटी रुपयांचा गैरप्रकार, भ्रष्टाचार झालेला आहे याकडे सत्ताधारी व विरोधी गटातील लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष का झाले याबाबत सुद्धा आता नागरिकांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads2"]

यावल शहरातील यावल भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका बियर दुकानात बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान ४ जण बियर पिण्यासाठी आले असता त्यांचे बियर पिणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या नोटांच्या बंडलातुन दुकानदारास बिलापोटी पाचशेची बनावट नोट दिली.

दरम्यान ५०० रुपयांच्या चलनी नोटा या बनावट असल्याचे संशय दुकानदारास आल्याने संबंधित बिअर दुकानातील व्यक्तीला ती नोट बनावट असल्याचे लक्षात आले. दुकानदार तडकाफडकी दुकान बंद करून या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या सोबत असलेल्या दोन जणांचा बियर दुकानाचे शटर बंद करून पकडून त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले असले तरी आता या बनावट नोटांमागील खरे सूत्रधार कोण आणि कुठले यांचा मागील महिना पकडल्या गेलेल्या आरोपींची काही संबंध आहे का याबाबत अनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात आहेत यांनी विधानसभा निवडणुकीत सुद्धा बनावट नोटा चलनात आणलेल्या आहेत का याची चौकशी सुद्धा पोलिसांनी करायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

दरम्यान यातील २ जण दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले.या संदर्भात यावल पोलिसांकडून या २ जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.


यावल शहरात बनावट नोटा चलनात येण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे.रावेर यावल विधानसभा मतदारसंघ हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन परप्रांतीय राज्याच्या सीमेला लागून असून निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे बनावट नोटा चलनात येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात काही बोगस कामांसोबत बनावट नोटांचा संबंध कोणाकोणाची आहेत याचा तपास लागणे महत्त्वाचे झाले आहे.

     रावेर विधानसभा मतदारसंघात मूळ ठेकेदारांच्या नावावर दुसरेच मध्यस्थी बोगस निकृष्ट प्रतीची कामे कोणत्या नियमानुसार आणि कोणाच्या प्रभावाखाली करतात..? यांचे उद्योग धंदे काय काय आहेत..? हे बोगस कामे आणि अवैध धंदे तसेच बनावट नोटा चलनात आणणारे कोणा कोणाच्या संपर्कात असतात..? याचा पर्दा फाश पोलिसांच्या गोपनीय शाखेने, आर्थिक गुन्हे शाखेने लावून सत्य काय ते जनतेसमोर आणायला पाहिजे असे सुद्धा आता संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️