रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी रावेर येथील तहसील कार्यालय येथे रावेर यावल विधानसभा मतदार संघासाठी मतदान यंत्रांचा सीलिंग व सेटिंग चे कामकाज करण्यात आले. यामध्ये एकूण 27 टेबल ठेवण्यात आले होते. सदर टेबल वर एक सेक्टर अधिकारी व त्यांना सहाय्यक 2 एक परिचर देण्यात आला आहे. एकूण 324 युनिट व राखीव 72 असे 396 मशीन मतदानासाठी तयार ठेवावयाचे आहे.[ads id="ads1"]
त्यासाठी 27 टेबलावर एकूण 13 round घेण्यात येणार आहे, त्यापैकी आज 10 राऊड पूर्ण झाले असून उर्वरित 3 राऊंड उद्या पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मोक पोल उद्या सकाळी 7.30 वाजता घेण्यात येणार आहे. सदर कामकाजास आज रोजी म. अरुण कुमार साहेब जनरल observar यांनी भेट देऊन माहिती घेतली.[ads id="ads2"]
व कर्मचाऱ्यास मार्गदर्शन केले. या प्रसंगी म. बबन काकडे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मोहनमाला नाझीरकर तहसीलदार यावल,तसेच बंडू कापसे तहसीलदार रावेर, नायब तहसीलदार यावल रावेर व कर्मचारी उपस्थित होते.