रावेर यावल विधानसभा मतदार संघाच्या वंचितच्या उमेदवार शमीभा पाटील यांनी पांचाळ समुदायातील झोपडीत जाऊन केली 'दिवाळी गोड'

 

वंचित च्या उमेदवार शमीभा पाटील यांनी पांचाळ समुदायातील झोपडीत जाऊन केली 'दिवाळी गोड'

 फैजपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि. १ नोव्हें. २०२४ रोजी छत्री चौक, फैजपूर येथून अत्यंत आकर्षक आणि उत्साही पद्धतीने शमिभा पाटील यांच्या प्रचाराचा प्रारंभ केला आहे. प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून या प्रचार प्रारंभाची सुरुवात केली गेली. मुख्य म्हणजे संबंधित शहरातील पांचाळ समुद्यातील झोपडीत दिवा लावून आणि त्यांच्या पारंपरिक पद्धतीने पूजा करून, त्यांना कपडे आणि मिठाई भेट देत 'वंचितांच्या घरी लावू दिवा' हा कार्यक्रमाने आम्ही प्रत्येक वंचित समुदयाच्या सुखा -दुःखात सोबत असल्याचा संकेत देण्यात आला.[ads id="ads1"]

प्रसंगी, शमिभा पाटील यांनी, ' ही लढाई लोकशाही, संविधान आणि या मतदार संघातील प्रत्येक वंचित घटकासाठी लढत असल्याचे सांगितले. तसेच पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहून सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेला मी कायम प्रामाणिक राहील असे आश्वासन देखील त्यांनी दिले.' [ads id="ads2"]

  यावेळी पक्षाच्या जिल्हा महासचिव एडवोकेट योगेश तायडे, जिल्हा संघटक ईश्वर लहासे प्रवीण भाऊ भालेराव सावंत दादा भालेराव भगवान भाऊ मेघे विजय दादा भोसले सोनू भाऊ मेढे विनोद भाऊ तडवी हसीना बाई तडवी भीम आर्मी तालुकाध्यक्ष हेमराज भाऊ तायडे शहराध्यक्ष मोहसीन भाई तडवी सागर भाऊ मेघे अजय भाऊ केदारे दिलीप भाऊ भालेराव प्रेम मेढे विशाल तायडे परवेज शेख अक्षय तायडे प्रशिक तायडे रमजान भाई तडवी शिरीष दादा दीपक वाघ अमोल पांडव शुभम तायडे धीरज मेढे रोहित मेढे प्रदीप तायडे नानाभाऊ संन्यास मुस्ताक शेख रफिक बेग  गोलू सोनवणे गोलूभाऊ अवसरमल कार्यकर्त्यांसह अनुसूचित जाती -जमाती, मुस्लिम -अल्पसंख्यांक, ओबीसी आणि मराठा यांसारख्या बहुजन समुदयातून अनेक कार्यकर्ते, अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था -संघटनांची नेते -कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते.

हेही वाचा : Ground Zero Report Jalgaon District: जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कुणाचे वर्चस्व, कुणाची भूमिका ठरणार महत्वाची?

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️