महाराष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पहिली सभा "या" शहरात: 45 एकरवर मैदानावर सभेची जय्यत तयारी

महाराष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पहिली सभा "या" शहरात: 45 एकरवर मैदानावर सभेची जय्यत तयारी

 महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक (Maharashtra  Vidhansabha Election 2024) प्रचाराचे नियोजन महाविकास आघाडी (Mahavikas  Aaghadi) आणि महायुतीकडून (Mahayuti ) झाले आहे. या निवडणूक प्रचारात स्टार प्रचाराकांना उतरवले जाणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणार आहे.[ads id="ads1"]

पहिली सभा धुळ्यात (Dhule,Maharashtra)  8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेसाठी धुळे शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या खान्देश गो शाळेच्या मैदानावर जय्यत तयारी सुरु झाली आहे. तब्बल 45 एकरवर ही सभा होणार आहे. या सभेला एक लाख नागरिक येणार आहे.[ads id="ads2"]

मोदी 14 नोव्हेंबरपर्यंत सभा घेणार

महायुतीसाठी उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) अनुकूल राहिलेला आहे. त्या ठिकाणी धुळे, जळगाव, मालेगाव बाह्य येथील महायुतीच्या उमेदवारांची प्रचार सभा होणार आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 40 नेत्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवस महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. 14 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. त्यात राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असणार आहे. शिवसेना उबाठाची प्रचार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सांभाळणार आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️