Ground Zero Report Jalgaon District: जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कुणाचे वर्चस्व, कुणाची भूमिका ठरणार महत्वाची?

 


जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघापैकी आठ विधानसभा क्षेत्रांवर मराठा मतदारांचे वर्चस्व आहे. तसेच जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये मराठ्यांसह लेवा पाटील समाजाचे पाच ठिकाणी वर्चस्व असलेले क्षेत्र आहे.

त्या ठिकाणी लेवा पाटील समाज्याच्या मतदानाचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असल्याने ज्यांच्या बाजूने मराठा वोटिंग राहणार ते या विधानसभेच्या रणधुमाळीत विजयी होणार असे संकेत आहे. यानंतर लेवा, मुस्लिम, गुजर पाटील, अल्पसंख्यांक, माळी, ओबीसी, आदिवासी पाडे, राजपूत या समाजाची वोटिंग महत्त्वाची ठरणार आहे.[ads id="ads1"] 

जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. यामधील रावेर, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल, पाचोरा जामनेर या विधानसभा क्षेत्रांवर मराठा समाजाचे वोटिंग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मराठ्यांबरोबरच लेवा पाटील समाजाची भूमिका अकराही मतदारसंघात महत्त्वाची असेल. यामध्ये मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, जळगाव शहर आणि एक असे लेवा पाटील समाजाचे वर्चस्व आहे.

मराठा, लेवा पाटील समाज यांच्या मतदारांची संख्या पाहिली असता प्रत्येक विधानसभा क्षेत्रात हे दोन्ही समाज महत्त्वाची भूमिका बजावतात. 2024 च्या निवडणुकीमध्ये स्वकीयांचे बंड अपक्ष उमेदवारांची संख्या पाहता अनेक ठिकाणी मराठा व लेवा समाजाच्या मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे बौद्ध,मुस्लिम, गुजर पाटील, माळी , कोळी ओबीसी, राजपूत आदिवासी पाडे, हे समाज या विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.[ads id="ads2"]

रावेर (Raver Vidhansabha 2024)

रावेर विधान सभेचा विचार केला असता या विधानसभा क्षेत्रामध्ये लेवा पाटील,मराठा ,मुस्लिम अल्पसंख्यांक,बौद्ध गुजर पाटील यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उमेदवार पाहिले असता लेवा समाजाची वोट यांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे मराठा व गुजर पाटील , बौद्ध,मुस्लिम व इतर समाजाच्या मतांवर सर्व निर्णय अवलंबून आहे.

भुसावळ (Bhusawal Vidhansabha 2024)

भुसावळ मध्ये भाजपाचे उमेदवार असलेल्या भाजपाच्या बालेकिल्ला झालेला असल्याने या ठिकाणी पाहिजे त्या ताकतीचा उमेदवार नसल्यामुळे नाराज मतदार व मुस्लिम वोटिंग व  बौद्ध वोटिंग यांच्यामुळे निर्णय बदलू शकतो .

जळगाव शहर (Jalgaon City Vidhansabha 2024)

जळगाव शहर या विधानसभा क्षेत्रामध्ये लेवा पाटील मराठा संख्या या मतदारांची महत्त्वाची भूमिका आहे तसेच कोळी व धनगर हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यामध्ये मुख्य लढत असलेले दोन्ही उमेदवार एकाच समाजाचे असल्याने त्यांच्यात लेवा पाटील समाजाचे मतांची विभागणी होऊ शकते.

जळगाव ग्रामीण (Jalgaon Rural Vidhansabha 2024)

जळगाव ग्रामीण या मतदारसंघावर मराठा माळी आणि गुजर या समाजाचे प्रभुत्व आहे यात अल्पसंख्यांक मतदारही आहेत मात्र जळगाव ग्रामीणमध्ये माळी समाज की फॅक्टर आहे .

चाळीसगाव (Chalisgaon Vidhansabha 2024)

चाळीसगाव मध्ये मराठा वोटिंग महत्त्वाचे ठरणार आहे. या जोडीला अल्पसंख्यांक समाज कोणाच्या बाजूने जातो ते महत्त्वाचे ठरू शकते.

चोपडा (Chopada Vidhansabha 2024)

चोपडा या मतदारसंघात जरी राखीव असला तरी या संघात कोळी व इतर अल्पसंख्यांक समाज विनिंग फॅक्टर ठरवणार ते महत्त्वाची भूमिका बजाऊ शकतो.

अमळनेर (Amalner Vidhansabha 2024)

अमळनेर या विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा व मुस्लिम बहुसंख्य असल्याने हे निर्णय भूमिका बजावीत असतात मात्र यावेळेस लेवा पाटील अल्पसंख्यांकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे .

एरंडोल(Erondol Vidhansabha 2024)

एरंडोल ह्या मतदारसंघात मराठा अल्पसंख्यांक समाज हे महत्त्वाचे फॅक्टर ठरत आलेले आहेत व यांच्याच भूमिकेवर दरवेळेस या विधानसभा क्षेत्रातील उमेदवार विजयी किंवा पराभूत ठरत असतो.

पाचोरा (Pachora Vidhansabha 2024)

पाचोरा विधानसभा क्षेत्रावर मराठा ओबीसी व राजपूत हा अल्पसंख्यांक समाज महत्त्वाची भूमिका बजावत असतो मात्र यावेळेस ओबीसी समाज कोणाच्या बाजूने जाणार हे लक्षवेधी राहणार आहे.

जामनेर (Jamner Vidhansabha 2024)

जामनेर महाराष्ट्राच्या राज्याच्या दृष्टीने संकट मोचक असलेले गिरीश महाजन यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा व आदिवासी पाडे हे नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहेत. मराठा वोटिंग व आदिवासी पाडे यांच्या बाजूने असणार तेच विजयी होत असल्याचे आतापर्यंतचे गणित आहे. अल्पसंख्यांक समाजाचे महत्त्वाची भूमिका सुद्धा यावेळेस राहणार आहे.

मुक्ताईनगर (Muktainagar Vidhansabha 2024)

मुक्ताईनगर या विधानसभा क्षेत्रावर लेवा पाटील समाजाने आपले वर्चस्व कायम ठेवलेले आहे. मात्र मराठा उमेदवाराने बाजी मारत आपला ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे यावेळेस लेवा पाटील मराठा गुजर राजपूत अल्पसंख्यांक या मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️