यावल ( सुरेश पाटील ) : केळी पीक विमा संदर्भात विमा कंपनीने जळगाव जिल्ह्यात फक्त यावल महसूल मंडळ वगळून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याने तसेच राजकीय लोकप्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने यावल महसूल मंडळातील शेतकऱ्यांची केळी पीक विमा संदर्भातील व्यथा आणि कथा ऐकून तटस्थ भूमिका घेत असल्याने यावल महसूल मंडळ केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आता न्यायालयामार्फत केळी पीक विमा संदर्भात न्याय मागून सरकारला दणका देणार आहे. [ads id="ads1"]
गेल्या महिन्यापासून केळी पिक विमा संदर्भात यावल महसूल मंडळातील शेतकरी सर्व लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे हेलपाट्या मारत असून त्यांची जात कोणीही घेत नाही जळगाव जिल्ह्यात फक्त यावल महसूल मंडळच कसे सुटले..? असा प्रश्न उपस्थित केला जात असून याबाबत कोणीही शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेत नसल्याने यावल महसूल मंडळातील शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक व्हावी यावल येथे श्री महर्षी व्यास मंदिरात आज दि.३० ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता घेण्यात आली.[ads id="ads2"]
या बैठकीत यावल महसूल मंडळ केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून समितीमध्ये यावल महसूल मंडळातील एकूण १९ गावातील प्रत्येकी २ शेतकऱ्यांची समिती करण्यात आली. बैठकीत यावल महसूल मंडळातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. ही समिती तज्ञ वकिलामार्फत न्यायालयातून केळी पीक विमा संदर्भात न्याय मागणार असल्याचे निश्चित करण्यात आले.