यावल ( सुरेश पाटील ) राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याचा आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी आज बुधवार दि. ९ रोजी काढला आहे त्यानुसार यावल नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त गट 'ब' चे निशिकांत गवळी यांची पदस्थापना करण्यात आली.[ads id="ads1"]
आदेश बघितला असता त्यात नमूद करण्यात आले आहे की जुम्मा कासम प्यारेवाले यांची तुमसर येथे तसेच अमोल बागुल ( एरंडोल ) ,श्रीमती विजया घाडगे (शेवगाव जिल्हा अहमदनगर ), श्रीकांत लाळगे ( लोहा, जिल्हा नांदेड ) , निशिकांत गवई ( यावल )
रामनिवास झवर ( धरणगाव ), सचिन पूदाके ( बिलोली, जिल्हा नांदेड ) सुरज जाधव ( जळगाव जामोद ( जिल्हा बुलडाणा ), अंबादास गर्कळ ( मुक्ताईनगर ), अविनाश गांगोडे ( नवापूर, जिल्हा नंदुरबार ), सचिन बच्छाव ( मुरुड जंजिरा जिल्हा रायगड या ठिकाणी पदस्थापना करण्यात आलेली आहे.[ads id="ads2"]
सदरील आदेश तात्काळ अंमलात येतील.सर्व अधिकाऱ्यांनी पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू व्हावे व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.तसेच सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापनेत बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास,ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक ) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामुळे,ती गैरवर्तणूक समजून त्यांच्या विरुध्द शिस्तंभग विषयक कारवाई करण्यात येईल,याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.तसेच, त्यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मधील तरतूदींनुसार शिस्तंभग विषयक कारवाई करण्यात येईल,याची संबंधितांनी नोंद घ्यावी.असे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.