रावेर प्रतिनिधी :
मौजे भोकरी येथील अतिक्रमण धारकांनी अतिक्रमित घरे कायम होणे कामी व नियमां कुल होणे कामी दिनांक 15ऑगस्ट रोजी संविधान आर्मी रावेर तालुका अध्यक्ष अशोक भाऊ अटकाळे यांचे कडे तोंडी विनंती केली असता दि.23/8/24 रोजी अशोक भाऊ यांचे नेतृत्वाखाली भोकरी ग्रा प येथे निवेदन देण्यात आले होते.[ads id="ads1"]
कारण ग्रामस्थ सुमारे 30ते 40वर्षांपासून रहिवास करीत आले आहे, सर्वांची परिस्थिती गरिबीची व हलाखीची आहे सर्व कुटुंब भूमी हीन आहेतः या कुटुंबीयांना आज पावेतो शासनाच्या योजनांचा कोणताही लाभ मिळालेला नाही, त्यांची अतिक्रमित जागा भो क री ग्राम पंचायत ने कायम केलेली नाही तसेच अश्या गरीब कुटुंबांना सुविधा नाहीत . या सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात यासाठी संविधान आर्मी चे निवेदन BDO Raver यांना देण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी संविधान आर्मी चे कार्यकर्ता व युवा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे, अशोक भाऊ अटकाळे जिल्हा अध्यक्ष, हनीफ तडवी तालुका अध्यक्ष आदिवासी सेल, ऍड दिपक तायडे सर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व असंख्य कार्य कर्त्यांसमवेत निवेदन देण्यात आले आहे.