पाणी मुबलक असल्यावर सुद्धा यावल शहरात ऐन दिवाळीत ४ दिवसाआड पाणीपुरवठा

 


एक्सप्रेस फिडर वारंवार बंद पडत असल्याने वीज पुरवठा होतो खंडित

यावल ( सुरेश पाटील ) ऐन दिवाळीत यावल शहरात ४ दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने यावल नगरपालिकेच्या आणि वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे यावलकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]

       यावल शहराला पाणीपुरवठा सुरळीत नियमित होण्यासाठी साठवण तलावात मुबलक पाणी उपलब्ध आहे परंतु साठवण तलावाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक पंप जळाल्याने तसेच एक्सप्रेस फिडर वरून नेहमी वीज पुरवठा नियमित सुरळीत होत नसल्याने यावल शहराला दररोज अंदाजे ४० ते ५० लाख लिटर पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याने ४ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय यावर नगरपरिषदेने घेतला परंतु ऐन सणासुदीच्या दिवसात ४ दिवसाआड पाणीपुरवठा होणे म्हणजे यावल नगरपालिकेचा निष्क्रिय भोंगळ कारभार सुरू असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण यावल शहरात व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]

  एक्सप्रेस फिडरव्यवस्था वीज वितरण कंपनी किंवा योजना राबविताना त्यात काय चुकीचे निर्णय घेतले गेले याबाबत यावल नगरपालिकेने काय कारवाई केली..? तसेच एक्सप्रेस फिडरवरून सुरळीत नियमित वीज पुरवठा होण्यासाठी यावल नगर परिषदेने वीज वितरण कंपनीकडे वारंवार लेखी तक्रार करून सुद्धा वीज वितरण कंपनी एक्सप्रेस फिडरचा वीज पुरवठा सुरळीत का करीत नाही..? इत्यादी अनेक प्रश्न यावल शहरात उपस्थित केले जात आहेत आणि पाणी मुबलक असताना यावलकरांना किमान २ दिवसात पाणीपुरवठा व्हायला पाहिजे अशी सर्व स्तरातील मागणी होत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️