यावल न.प.च्या बगीच्यातील सप्तपणीच्या झाडांमुळे शिवाजीनगर,देशमुखवाड्यातील आरोग्य धोक्यात : यावल नगरपरिषदेवर भव्य मोर्चा

 


यावल (सुरेश पाटील) : यावल येथील शिवाजीनगर परिसरातील प्राचीन प्रसिद्ध श्री महर्षी व्यास मंदिराजवळ यावल नगरपरिषदेच्या बगीच्यातील सप्तपर्णीच्या झाडांमुळे त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे सप्त पडण्याची झाडे नगरपरिषदेने तात्काळ काढण्यासाठी शेकडो महिलांनी,तरुण कार्यकर्त्यांनी आज यावल नगरपरिषदेवर आपला मोर्चा काढून मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना लेखी निवेदन देऊन सप्तपर्णीची झाडे तत्काळ काढून टाकण्याची मागणी केली. [ads id="ads1"] 

यावल नगर परिषदेने म्हणजे बगीच्या विकसित करणाऱ्या ठेकेदाराने बगीच्यात मोठ्या प्रमाणात सप्तपर्णी झाडांची लागवड केली होती आणि आहे त्यानुसार ती जाडे आज खूप मोठी झालेली आहेत त्या झाडांना मोहर व फुले आल्यावर दिवसभर त्या फुलांचा पर्यायी झाडांचा उग्रवास त्या परिसरातील नागरिकांना येत असतो पर्यायी त्या परिसरातील नागरिकांना घरात राहणे आणि घराबाहेर पडणे मुश्किल झाले, श्वास घ्यायला खूप अडचणी येत आहेत पर्यायी आरोग्य धोक्यात आले आहे.परिसरात तारकेश्वर विद्यामंदिर लहान मुलांची शाळा आहे व प्राचीन जागृत महादेव मंदिर तसेच श्री महर्षी व्यास मंदिर असल्याने सकाळ संध्याकाळ आणि दिवसभर मंदिरांमध्ये दिवसभर भाविक ये जा करीत असतात.या उग्र वासामुळे श्वास घेण्याबाबतच्या तक्रारी जास्त वाढलेल्या आहेत.[ads id="ads2"] 

  ज्यांना हृदयाचा व अस्थमाचा त्रास आहेत असे नागरिक तर घराच्या बाहेरही निघू शकत नाहीत.मागील वर्षीही अशीच तक्रार या परिसरातील नागरिकांनी दिली होती व मोर्चाही काढला होता,तेव्हाचे तत्कालीन मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी ठराव नोंदवून सप्तपर्णीची झाडे तोडण्याचे आदेशही दिले होते अशी नोंद आपल्या दफ्तरी आहे,परंतु निवडणुकीचे आदेश आल्यामुळे त्या कामास विलंब झाला होता. आपण आमच्या परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या सप्तपर्णीच्या झाडांचा बंदोबस्त करावा. सप्तपणीची झाडे इतर शहरांमध्ये प्रशासनाने नष्ट केलेली असून

आपणही लवकरात लवकर ही झाडे नष्ट करावी जे संतप्त मागणी उपस्थित महिला तरुणांनी मुख्याधिकारी यावल यांच्याकडे केली.

   यावल नगरपरिषद मुख्याधिकारी  म्हणून काल मंगळवार दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी निशिकांत गवई यांनी दुपारी ४ वाजता पदभार स्वीकारला २४ तास पूर्ण होत नाही त्याच्या आत सप्तपणीची झाडे हटविण्यासाठी यावल शहरातील अंदाजे शंभर महिला पुरुष तरुणांनी यावल नगरपरिषदेवर मोर्चा काढून यावल नगरपरिषदेच्या कारभाराची जाणीव मुख्याधिकारी यांना करून दिली.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️