ऐनपूर महाविद्यालयात बौद्धिक संपदा हक्क याविषयी मार्गदर्शन

 


सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे विद्यापीठाच्या KCIIL अंतर्गत महाविद्यालयाच्या नवोपक्रम आणि उद्योजकता विकास सेल (KIEDC) मार्फत ‘बौद्धिक संपदा हक्क’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. [ads id="ads1"] 

  या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाच्या KIEDC चे प्रमुख डॉ. डी. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  KIEDC चे समन्वयक डॉ. जे. पी. नेहेते यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व महाविद्यालयात असलेल्या उद्योजकता सेल या विषयी माहिती सांगितली. डॉ. डी. बी. पाटील यांनी आपल्या भाषणात आपल्याकडील असलेल्या नवकल्पना तथा आविष्काराचे किंवा निर्मितीचे विशिष्ट कालावधीसाठी संरक्षण करण्यासाठी दिलेले कायदेशीर अधिकार याविषयी सखोल माहिती सांगितली.[ads id="ads2"] 

   तसेच महाविद्यालयातील उदोजकता सेलच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या नवकल्पना तथा उदयोगांविषयी काही योजना असल्यास त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले. तसेच आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग उभारून परिसरात रोजगार दिला पाहिजे असे सांगितले. प्राचार्य डॉ. अंजने यांनी आजच्या युवकांनी उपलब्ध असलेल्या उद्योजकता विषयी शासकीय योजना व संधी जाणून उद्योजकता ही करिअर निवड केली पाहिजे असे त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एच. एम. बावीस्कर यांनी मान्यवरांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वैष्णव तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️