यावल येथील स्वामीनारायण मंदिरात हिंदुत्ववादी महायुतीचा मोठा मेळावा संपन्न : इच्छुक असलेले उमेदवार व्यासपीठावर होते उपस्थित

 


उमेदवारी अर्ज दाखल करणार

यावल ( सुरेश पाटील ) शनिवार दि.२५ ऑक्टोबर २०२४ रोजी यावल येथील श्री स्वामीनारायण मंदिरात हिंदुत्ववादी महायुतीचा मोठा भव्य असा मेळावा हजारो लाडक्या बहिणींसह नागरिक,महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या मेळाव्यात एक मत रावेर विधानसभेच्या प्रगतीसाठी मिळेल अशा अपेक्षा आणि आश्वासन उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगततून व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे रावेर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी तर्फे या प्रबळ अशा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागितली होती त्यांनी सुद्धा उपस्थिती देऊन आपले मनोगत व्यक्त करून शासनाच्या विविध योजनांची माहिती व आपल्या पक्षाची ध्येय उद्दिष्टे उपस्थितांसमोर ठेवून महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना मतदान करण्यासाठी आव्हान केले.[ads id="ads1"]

      श्री स्वामीनारायण मंदिरात महायुती मेळाव्याचे प्रास्ताविक भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी किशोर कुलकर्णी यांनी आपल्या काव्यशैली भाषेतून केले. मेळाव्यात डॉ.कुंदन सुधाकर फेगडे, हिरालालभाऊ चौधरी,शिवसेनेचे पंकज बारी,अरविंद देशमुख यांच्यासह महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून हिंदुत्ववादी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी रावेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.[ads id="ads2"]

      व्यासपीठावर डॉ.कुंदन फेगडे, पांडुरंग सराफ,शरददादा महाजन,हीरालालभाऊ चौधरी,अरविंद देशमुख,हर्षल पाटील,विलास चौधरी,पंकज बारी,उमेश फेगडे,

हेमराज फेगडे,रवींद्र पाटील,प्रमोद नेमाडे,विष्णू पारधे,पी.एस.पाटील सर,गणेश गिरधर नेहेते,किशोर कुलकर्णी,पुंडलिक बारी,नितीन सोनार,सविता भालेराव,सरला कवडीवाले,माधुरी फेगडे,रोहिणी फेगडे,महेश वाणी,नागेश्वर साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, योगेश पाटील यांच्यासह त्यांचे महिला पदाधिकारी,कार्यकर्ते त्यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

        महायुतीचा महामेळावा यशस्वीतेसाठी देविदास धांगो,डी. डी.चौधरी,उज्जैनसिंग राजपूत, नारायण बापू,नितीन महाजन, शशिकांत देशमुख,राजेंद्र फालक,यावल शहरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते राहुल बारी,योगेश चौधरी,पराग सराफ इत्यादी अनेकांनी परिश्रम घेतले.

   अमोल जावळे हे सोमवार दि. २८ रोजी सकाळी दहा वाजता रावेर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज जिल्ह्यातील वरिष्ठ मंत्री व नेत्यांच्या उपस्थितीत मोठे शक्ती प्रदर्शन करीत ढोल-ताशांच्या गजरात शक्तीप्रदर्शन करीत भरणार आहेत आहेत.या रॅलीत मंत्री गिरीश महाजन,केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री गुलाबराव पाटील,मंत्री अनिल पाटील तसेच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि हजारो महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रावेर शहरातील पाराचा गणपती मंदिरापासून सुरुवात होईल.रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन भाजपा तर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️