रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भरलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निरीक्षक अरुणकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली असून यात २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून दोन अर्ज ए बी फॉर्म नसल्याने अवैध ठरविण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी दिलेली माहिती अशी की,निवडणूक प्रक्रियेत एकूण २५ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले होते.[ads id="ads1"]
दि ३० रोजी छाननी प्रक्रियेत शिरीष मधुकरराव चौधरी, यांनी काँग्रेस कडून तर जयश्री अमोल जावळे यांनी भाजपा कडून अर्ज दखल करण्यात आले होते परंतु पक्षाचे ए बी फॉर्म त्यांच्या नावाने नसल्याने ते बाद करण्यात आले असून खालील उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. [ads id="ads2"]
अमोल हरिभाऊ जावळे भाजपा, नारायण हिरामण अडकमोल बहुजन समाज पार्टी, चौधरी धनंजय शिरीष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शमीभा भानुदास पाटील वंचीत बहुजन आघाडी,चौधरी अनिल छबीलदास प्रहार जनशक्ती पक्ष,इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी, आरिफ खलिक शेख ऑल इंडिया मजलीस ए इन्कलाब ए मिल्लात, दारा मोहम्मद जाफर मोहम्मद अपक्ष, डीडी वाणी फोटोग्राफर अपक्ष, शेख कुर्बान शेख करीम अपक्ष, संजय हमीद तडवी अपक्ष, महेंद्र गंगाराम बाहे अपक्ष, तडवी नूर मोहम्मद इब्राहिम अपक्ष, फकीरा अबाज तडवी अपक्ष, चौधरी संजय अर्जुन अपक्ष, भालचंद्र वामनराव जडे अपक्ष चौधरी धीरज अनिल अपक्ष चौधरी नंदिनी अनिल अपक्ष, चौधरी हर्षा अनिल अपक्ष, महंमद शफिखान मुस्तफा तडवी अपक्ष, उमा विठ्ठल भिल अपक्ष हे वैध आहेत.
पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर निवडणुकीचे कामकाज प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी बंडू कापसे, मोहनमाला नाझीरकर यांच्यासह नायब तहसीलदार संजय तायडे, किशोर पवार, अतुल गांगुर्डे, आर डी पाटील, मनोज खारे, राजेंद्र फेगडे, जगदीश गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कामकाज पार पाडले.