यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तोल काट्यात गारा साचल्याने मापात पाप..? शेतकऱ्यांनी केली भाजप सत्तेची पोल खोल


यावल ( सुरेश पाटील )

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एका शेतकऱ्यांने आपला मका विक्रीसाठी आणला असता धान्य व्यापारी,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बाजार समितीचा तोल काटा चालक यांच्या संगनमताने तथा बेजबाबदार पणामुळे एका शेतकऱ्याचा ४० किलो मका व्यापाऱ्याला जास्त जाणार असल्याचे म्हणजे "मापात पाप "करण्याचा उद्योग उघड झाल्याने एका शेतकऱ्याने भाजप प्रणित सभापती कारभाराची पोलखोल उघड केल्याने इतर शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीसह इतर काही संचालकांचे शेतकरी हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचे तालुक्यात बोलले जात असले तरी या वृत्ता बाबत बाजार समितीचे सचिव सोनवणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला असून बाजार समितीच्या तोल काट्यावर माती युक्त गारा साचल्याने वजनात फरक पडल्याचे त्यांनी मान्य करून तोल काटा तात्काळ साफ-सफाई करून दुरुस्त करण्याची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.[ads id="ads1"]

     आज सोमवार दि.२८ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान यावल शहरातील एका शेतकऱ्याचा एक टन मका धान्य व्यापारा मार्फत मोजणीसाठी आला असता वजन काट्यावर तो मका ९ क्विंटल ६० किलो वजनाचा दिसून आला शेतकऱ्याला शंका आल्याने त्यांनी टोल काट्यावरील एक टन वजनाचे माप ठेवून तोल काट्याची खात्री केली असता ४० किलोचा फरक दिसून आला, म्हणजे व्यापारी एक टन वजनाचा मका खरेदी करताना  ४० किलो मका जास्त घेणार होता. म्हणजे शेतकऱ्याचा ४० किलो मका व्यापाऱ्याला जास्त जाणार होता या मुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य व्यापारी, बाजार समिती सभापती,आणि काही संचालक तसेच तोल काटा चालक यांचे संगनमताने बेजबाबदारपणा सुरू आहे का..? [ads id="ads2"]

  याच प्रमाणे बाजार समितीच्या तोल काट्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांची केळी,मका,ज्वारी इत्यादी धान्य मोजमाप करताना अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक होत आहे का..? बाजार समितीच्या आवारात तोल काट्यावर माती किंवा मातीयुक्त गारा साचत असतो तोपर्यंत बाजार समितीचे सभापती तथा संचालक काय पाहणी करतात..? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने बाजार समिती सभापतीची निवड करताना कोणते निकष लावण्यात आले..? असे सुद्धा आता यावल तालुक्यात बोलले जात असून राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष असल्याने यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानावर विपरीत परिणाम होणार असल्याने भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या भोंगळ कारभाराकडे आपले लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे असे बोलले जात आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️