डॉ.कुंदन फेगडे यांना उमेदवारी न मिळाल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात तीव्र असंतोष


निवासस्थानी जमलेल्या शेकडो महिला आज माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना विचारणार जाब

यावल ( सुरेश पाटील ) :  विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्वास दाखवला तर रावेर विधानसभा मतदारसंघात गेल्या ५ वर्षापासून सतत जनतेच्या संपर्कात राहून विविध कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन करून जनतेचा विश्वास संपादन करणारे यावल रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे सक्रिय पदाधिकारी यांची उमेदवारी डावलून भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर केल्याने संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून शेकडो महिला,पुरुष,तरुण कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना व त्यांच्या माध्यमातून मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज बुधवार दि. २३ रोजी प्रत्यक्ष भेटून डॉ. फेगडे यांना उमेदवारी मिळण्याची मागणी करणार आहेत.[ads id="ads1"]

       याबाबत सविस्तर माहिती अशी की रावेर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात कोणत्याही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा पदाधिकारी पाहिजे त्या प्रमाणात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात नव्हते,परंतु डॉ.कुंदन फेगडे यांनी संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी,बेरोजगारांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तसेच विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून दैनंदिन कामकाजातून वेळात वेळ काढून विविध सामाजिक हिताची कामे करून, अनेक कार्यक्रम घेऊन नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते, वरिष्ठ नेते यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहीत असून सुद्धा त्यांची उमेदवारी टाळणे म्हणजे विरोधी पक्षाला पोषक वातावरण निर्माण करून देणे आहे असे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात असून त्यांची उमेदवारी डावल्यामुळे रावेर विधानसभा मतदार संघातील व यावल शहरातील शेकडो महिलांनी डॉ. कुंदन फेगडे यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन करून जनतेच्या संपर्कात नसलेल्या अमोल जावळे यांना उमेदवारी मिळाली कशी..? [ads id="ads2"]

  अश्या संतप्त भावना व्यक्त करीत डॉ.कुंदन फेगडे यांना उमेदवारी मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन उद्या बुधवार दि.२३ रोजी माजी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत.तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबत फेर विचार न केल्यास भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करणेबाबत,बहिष्कार टाकणेबाबत संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात जनजागृती केली जाणार असल्याचा सुद्धा इशारा उपस्थित शेकडो महिलांनी दिला आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️