चिनावल ता.रावेर (किरण भीमराव भालेराव) : रावेर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम साठी नुकताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुमारे ४१ लाखा चा नियोजन मंडळाच्या २५/१५ तून निधीस मंजुरी मिळवून दिली या निधीतून होणाऱ्या नविन वास्तू चे भूमिपूजन अशोका विजया दशमी च्या दिवशीच चिनावल येथील लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव यांचे हस्ते करण्यात आले.[ads id="ads1"]
या प्रसंगी विचारपीठावर लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव तत्कालीन पं.स. सभापती माधुरी गोपाळ नेमाडे, उपसरपंच शे. शाहिन श्री मो. जाबीर मा.पंचायत समिती सदस्य गोपाळ नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोटू नेमाडे, माजी जि.प. सदस्य तनुजा सरोदे पं.स. सदस्य, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सन २०१९ मध्ये ना. गिरिश महाजन यांनी चिनावल ग्रामपंचायत ला भेट दिली होती तेव्हा तत्कालीन लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले सभापती माधुरी गोपाळ नेमाडे, गोपाल नेमाडे, योगेश बोरोले ग्रामपंचायत सदस्य सागर भारंभे उपसरपंच परेश महाजन, संदीप टोके, शे.अजगर व सर्व सदस्यांनी चिनावल ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी निधी मागितला होता. [ads id="ads2"]
तत्कालीन खा रक्षाताई खडसे, नंदू महाजन, सुरेश धनके यांनी शब्द दिला होता त्या बाबत चा प्रस्ताव ही दिला होता व या साठी निधी मंजूर केला होता. आज चिनावल ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन होवून लोकनियुक्त सरपंच सौ.ज्योती संजय भालेराव यांची वर्णी लागल्यावर उपसरपंच व सदस्यांनी तसेच सदस्य दूध संघ संचालक ठकसेन पाटील, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सागर भारंबे, माजी सभापती गोपाळ नेमाडे यांनी या साठी पाठ्युरावा करून आज रोजी ह्या कामाचे भूमिपूजन सरपंच सौ. ज्योती भालेराव यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सदस्य गावातील सर्व स्तरातील पदधिकारी, माजी सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. ह्या वेळी माजी सरपंच चंद्रकलाभंगाळे, हयात खान, अस्लम सेठ, शे जाबीर, गिरीश नारखेडे, ग्रामविकास अधिकारी कैलास भगत हजर होते. या वेळी आजी माजी ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार ही करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार संजय भालेराव सर यांनी केले.