रावेर(प्रतिनिधी) रावेर ते शेगावला जाणारी व मागील १४ वर्षापासून बंद असलेली एस.टी.महामंडळाची बस पुन्हा उद्यापासून सुरू होत असून मनसेच्या मागणीला मात्र यश आले असून भाविक भक्तांमधून मनसे सह एस.टी.महामंडळचे कौतुक केले जात आहे.[ads id="ads1"]
ही बस फेरी सुरू करण्याबाबत एस.टी.महामंडळ रावेर आगार प्रमुखांना नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिले होते.मात्र त्याची कुठेच दखल घेतली जात नव्हती.अखेर काही नागरिकांनी आणि भाविक भक्तांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांना भेटुन शेगाव बस पूर्ववत सुरू करण्याची विनंती केली होती त्याची दखल घेत मनसे तालुकाध्यक्ष श्री.राजपूत यांनी रावेर आगार प्रमुख इम्रान खान यांना प्रत्यक्ष भेटून व वेळोवेळी निवेदन देवून रावेर शेगाव बस पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली होती.[ads id="ads2"]
व त्याचीच दाखल घेवून रावेर आगारातून शेगावला जाणारी व १४ वर्षापासून बंद असलेली ही बस पुन्हा उद्यापासून सुरू होत आहे.त्यामुळे तालुक्यातील भाविक भक्तांसह प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.रावेर मनसे तालुका प्रमुख संदिपसिंह राजपूत यांनी दिनांक १२-०८-२४ रोजी आगारात जावून दर सोमवारी व शुक्रवारी राज्य परिवहन आगारात साजरा होणारा प्रवासी राजा दिनात जळगाव विभागाचे नियंत्रक बी.एस.जगनोर यांची भेट घेतली होती आणि शेगावला जाणाऱ्या भाविक भक्तांना आणि विदर्भातील जिल्हयात जाण्यासाठी होत असलेल्या त्रासाबद्दल धारेवर धरले होते.श्री संत गजानन महाराज मंदिर शेगावला जाणाऱ्या भाविक भक्तांना आणि प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख संदिपसिंह राजपूत यांनी एस.टी.महामंडळाचे आभार मानले आहेत.
ही बस सुरुवातीला आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस धावेल नंतर ती दिवाळी पासून नियमितपणे(दररोज)धावेल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.ही बस उद्या रविवारी सकाळी ७.०० वाजता रावेर आगारातून शेगाव जाण्यासाठी निघेल तर दुपारी १.३० वाजता शेगाव येथून रावेर जाण्यासाठी सुटेल.