रावेर तालुक्यातील विटवे येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

 


रावेर ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी विटवे येथे 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला, सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुण बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस, प्रमिलाबाई  अढागळे व रेखाबाई वानखेड़े,नरेंद्र वानखेड़े  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.[ads id="ads1"] 

  धुप पूजा, अरुण (बाळु )वानखेड़े, प्रल्हाद अढागळे, प्रकाश वानखेड़े, सुरेश तायड़े, यांचे हस्ते करण्यात आली या नंतर ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े यांनी सर्व उपस्थित समाज बांधवाना त्रिसरण पंचशील दिले व मनोगत व्यक्त करतांना असे  म्हटले की आज आपण जी वाटचाल जी प्रगति  करतोय ते धम्मचक्र प्रवर्तन झाल्यामुळे नाहीतर आपण सुद्धा अंधश्रद्धा, अनिष्ट, रुढि, परंपरा, यामध्ये अडकून राहिलो असतो, माणूस असून गुलामीचे जिवन जगले असते, म्हणुन सर्वानी धम्माचे आचरण करणे फार गरजेचे आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले.[ads id="ads2"] 

   या प्रसंगी ,  संजय वानखेड़े, सुनील अढागळे, भारत वानखेड़े, कविता तायड़े, प्रदीप अड़कमोल, लिलाबाई सावळे, आशा वानखेड़े, डिंगबर गणेश, गोपाल वानखेड़े,, कडु तायड़े,सुभाष लहासे, राजू वानखेड़े    सुनील गणेश व गावातील तरुण विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️