महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,

 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडवणीस आणि कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे हे पहिल्या यादीत आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांची नावं आहेत. यात मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांचंही नाव आहे.[ads id="ads1"]

नागपूरमधील कामठी मतदारसंघाचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचं तिकीट कापून, या जागेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आलीय.

पुण्यातील कसबा मतदारसंघातून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाहीय. इथे भाजपच्या मुक्ता टिळक आमदार होत्या. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली आणि त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केला होता. या जागेवर भाजपनं पहिल्या यादीत तरी उमेदवार दिला नाहीय.[ads id="ads2"]

तसंच, पुण्यातीलच वडगाव शेरीमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. इथे भाजपचे जगदिश मुळीक इच्छूक आहेत. या जागेवरही भाजपनं पहिल्या यादीत कुणीच उमेदवार दिला नाहीय.खडकवासल्यात भीमराव तापकीर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, पहिल्या यादीत त्यांचे नाव नाहीय.

मुंबईतील 14 उमेदवार भाजपनं जाहीर केले आहेत, मात्र वर्सोवा आणि बोरिवली या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाहीत. वर्सोव्यातून भारती लव्हेकर आणि बोरिवलीतून सुनील राणे हे दोघेही भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार :


1) नागपूर दक्षिण पश्‍चिम - देवेद्र फडणवीस


2) कामठी - चंद्ररशेखर बावनकुळे


3) शहादा (आजजा) - राजेश पाडवी


4) नंदुरबार (अजजा) - विजयकुमार गावीत


5) धुळे शहर - अनुप अग्रवाल


6) शिंदखेडा - जयकुमार रावल


7) शिरपूर (अजजा) - काशिराम पावरा


8) रावेर - अमोल जावळे

9) भुसावळ (अजा) - संजय सावकारे


10) जळगांव शहर - सुरेश भोळे


11) चाळीसगाव - मंगेश चव्हाण


12) जामनेर - गिरीश महाजन


13) चिखली - श्वेता महाले


14) खामगांव - आकाश फुंडकर


15) जळगांव (जामोद) - डॉ. संजय कुटे


16) अकोला पूर्व - रणधीर सावरकर


17) धामणगांव रेल्वे - प्रताप अडसद

18) अचलपूर - प्रवीण तायडे


19) देवळी - राजेश बकाने


20) हिंगणघाट - समीर कुणावार


21) वर्धा - डॉ. पंकज भोयर


22) हिंगणा - समीर मेघे


23) नागपूर-दक्षिण - मोहन माते


24) नागपूर-पूर्व - कृष्णा खोपडे


25) तिरोडा - विजय रहांगडाले


26) गोंदिया - विनोद अग्रवाल


27) आमगाव (.ज.जा) - संजय पुराम

28) आरमोरी (अजजा) - कृष्णा गजबे


29) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार


30) चिमूर - बंटी भांगडिया


31) वणी - संजीवरेड्डी बोडकुरवार


32) राळेगांव - अशोक उइके


33) यवतमाळ - मदन येरावार


34) किनवट - भीमराव केराम


35) भोकर - श्रीजया चव्हाण


36) नायगांव - राजेश पवार

37) मुखेड - तुषार राठोड


38) हिंगोली - तानाजी मुटकुले


39) जिंतूर - मेघना बोर्डीकर


40) परतूर - बबनराव लोणीकर


41) बदनापूर (अजा) - नारायण कुचे


42) भोकरदन - संतोष दानवे


43) फुलंब्री - अनुराधा चव्हाण


44) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे


45) गंगापूर - प्रशांत बंब


46) बागलान (अजजा) - दिलीप बोरसे


47) चंदवड - डॉ. राहुल अहेर


48) नाशिक पूर्व - अॅड. राहुल ढिकाले


49) नाशिक पश्चिम - सीमा हिरे


50) नालासोपारा - राजन नाईक


51) भिवंडी पश्चिम - महेश चौघुले


52) मुरबाड - किसन कथोरे


53) कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड


54) डोंबिवली - रवींद्र चव्हाण


55) ठाणे - संजय केळकर


56) ऐरोली - गणेश नाईक


57) बेलापूर - मंदा म्हात्रे


59) मुलुंड - मिहिर कोटेचा


60) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर


61) चारकोप - योगेश सागर


62) मलाड पश्चिम - विनोद शेलार


63) गोरेगाव - विद्या ठाकूर


64) अंधेरी पश्चिम - अमित साटम


65) विले पार्ले - पराग अळवणी


66) घाटकोपर पश्चिम - राम कदम


67) वांद्रे पश्चिम - अॅड. आशिष शेलार


68) सायन कोळीवाडा - आर. तमिल सेल्वन


69) वडाळा - कालिदास कोळंबकर


70) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा


71) कोलाबा - अ‍ॅड. राहुल नार्वेकर


72) पनवेल - प्रशांत ठाकूर


73) उरण - महेश बाल्दी


74) दौंड - अ‍ॅड. राहुल कुल


75) चिंचवड - शंकर जगताप


76) भोसरी - महेश लांगडे

77) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे


78) कोथरूड - चंद्रकांत पाटील


79) पार्वती - माधुरी मिसाळ


80) शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील


81) शेवगांव - मोनिका राजळे


82) राहुरी - शिवाजीराव कार्डिले


83) श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते


84) कर्जत जामखेड - राम शिंदे


85) केज (अजा) - नमिता मुंदडा


86) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर


87) औसा - अभिमन्यू पवार


88) तुळजापूर - राणा जगजीतसिंह पाटील


89) सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख


90) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी


91) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख


92) माण - जयकुमार गोरे


93) कराड दक्षिण - अतुल भोसले


94) सातारा - शिवेंद्रराजे भोसले


95) कणकवली - नितेश राणे


96) कोल्हापूर दक्षिण - अमोल महाडिक


97) इचलकरंजी - राहुल आवाडे


98) मिरज - सुरेश खाडे


99) सांगली - सुधीर गाडगीळ


source: bbc.com/marathi

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️