यावल ( सुरेश पाटील )
महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत दि.६ फेब्रुवारी २०२४ पासून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज भरून यावल नगरपरिषदेत जमा करावेत अशी माहिती यावल नगरपरिषदेचे स्थापत्य अभियंता सत्यम पाटील यांनी दिली.[ads id="ads1"]
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ध्येय उद्दिष्ट असे आहे की राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील जेष्ठ स्री पुरुष नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत
जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करणे करिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे
मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एकवेळ एक रकमी रु. ३०००/- पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T.) प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे आहे.[ads id="ads2"]
यात पात्र लाभार्थ्यांना चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक विल चेअर,फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची, निब्रेस,लंबर बेल्ट,सवाईकल कॉलर इत्यादी साहित्य खरेदी करता येणार आहेत.
पात्र लाभार्थ्यांनी अर्जासोबत आपल्या कौटुंबिक उत्पन्नाचे घोषणापत्र,तसेच यापूर्वी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणापत्र. यासह आधार कार्ड, मतदान कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईजचे दोन फोटो, स्वयघोषणापत्र, यासह शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे अर्जासोबत यावल नगरपरिषदेत अशी माहिती यावल नगरपरिषद स्थापत्य अभियंता सत्यम पाटील यांनी आज सोमवार दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी दिली.