'साखर' ऑनलाइन सेल करताना ५० टक्के झाली गायब : चौकशी गुलदस्त्यात?

 


पुरवठा अधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची मिली भगत ?

यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यात एप्रिल व मे २०२४ या महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून साखर वाटप न केल्याची तक्रार  यावल रावेर भीम आर्मी भारत एकता मिशन प्रचार प्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर राहणार सांगवी बुद्रुक यांनी यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे केली होती.चौकशी झाली असता स्वस्त धान्य दुकानातून साखर ऑनलाइन सेल /वितरित झाल्याचे दिसून येत असले तरी[ads id="ads1"]  रेशन धान्य लाभार्थ्यांना प्रत्यक्ष साखर न मिळाल्याने पुरवठा विभाग आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची मिली बघत असल्यानेच स्वस्त धान्य दुकानातून साखर न मिळाल्याची तक्रार करण्यात आली याबाबतचा चौकशी अहवाल सुद्धा गुलदस्त्यात दडपून असून संबंधितांवर कारवाई न झाल्याने तसेच यावल तहसीलदार हे पुढील चौकशी आणि कार्यवाही करीत असल्याचे समजले.

     साखर वाटप न केल्याबाबत विषयानुसार यावल तहसीलदार यांनी प्राथमिक चौकशी करून तक्रारदार राहुल जयकर यास दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की. तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी केली असता यावल तालुक्यातील माहे ऑक्टोबर,नोव्हेंबर, डिसेंबर २०२३ ची साखर एप्रिल २०२४ मध्ये माहे जानेवारी,फेब्रुवारी व मार्च २०२४ ची साखर आहे मे २०२४ मध्ये स्वस्त धान्य दुकानात पोहोच करण्यात आलेली आहे सदर साखर लाभार्थ्यांना वितरीत करणे बाबत शासकीय महाफुड या साइडवर जाऊन चौकशी केली असता ऑनलाइन सेलनुसार लाभार्थ्यांना साखर वितरित झाल्याचे दिसून येते सुलभ संदर्भ कामी आपणास सोबत साखर वितरण अहवाल जोडून पाठविण्यात येत असल्याचे नमूद केले असले तरी स्वस्त धान्य दुकानदारांनी ऑनलाइन साखर वितरित केली परंतु ती साखर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळाली किंवा नाही याबाबतची चौकशी सुरू असल्याचे समजले.[ads id="ads2"] 

        यावल तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदार आणि पुरवठा विभाग यांची मिली भगत कशी आहे..? आणि पुरवठा निरीक्षक,पुरवठा अधिकारी स्वस्त धान्य दुकानाची चौकशी कोणत्या पद्धतीने करतात, स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थी ग्राहकांना स्वस्त धान्य देताना कॅश मेमो पावती देतात किंवा नाही..? आणि तालुक्यातून पुरवठा विभागाच्या नावावर पुरवठा विभागातून मासिक हप्ते कोणता दुकानदार कोणाला देतो..? याबाबत सुद्धा चर्चा आहे याची सविस्तर चौकशी सुद्धा यावल तहसीलदार यांनी करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️