यावल ( सुरेश पाटील )
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सण नियमांचे काटेकोर पालन करीत तसेच कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता बाळगून शांततेत नव्हे तर मोठ्या जल्लोषात साजरा करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले आहे.[ads id="ads1"]
शनिवार दि. ७ सप्टेंबर आणि सोमवार दि.१६ सप्टेंबर २०२४ रोजी यावल शहरात अनुक्रमे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव सण हिंदू मुस्लिम बांधव साजरा करणार असल्याने उत्सव शांततेत आणि मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी गणेश मंडळाच्या सदस्यांच्या व मुस्लिम बांधवांच्या काय काय अडचणी आणि समस्या आहे या ऐकून घेण्यासाठी यावल पंचायत समिती सभागृहात आज बुधवार दि.४ सप्टेंबर २०२४ रोजी तालुक्यातील पोलीस पाटील आणि गणेश मंडळासह राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते, शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली.[ads id="ads2"]
या बैठकीत फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी उपस्थित शांतता समिती सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. गणेश विसर्जन रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार असल्याची माहिती दिली.ज्या समस्या आहेत त्या यावल नगरपरिषद, वीज वितरण कंपनी,महसूल विभाग यांच्यामार्फत सोडवून गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सव सण शांततेत नव्हे तर मोठ्या जल्लोसा साजरा होईल याबाबत काही सूचना देऊन मार्गदर्शन केले.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या राजाकडे प्रमुख कार्य करीत होते आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम बांधवांचा सहभाग कसा होता याचा अभ्यास केल्यास जात, धर्म भेद शिल्लक राहणार नाही आणि याबाबतचे प्रश्न उपस्थित तरुणांनाच विचारून उत्तरे त्यांच्याकडूनच घेऊन सकारात्मक प्रतिसाद अपर पोलीस अधीक्षक नखाते यांनी मिळविला.पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटण्याबाबत सूचना देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत आश्वासन दिले.
शांतता समिती बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी केले तर यावल पोलिसांनी बैठकीसाठी पंचायत समिती सभागृहात नियोजन केले होते.