खानापूर जुगारावर धाड टाकण्याचे धाडस फक्त आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांकडेच आहे का..?महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात जोरदार चर्चा


यावल/रावेर  ( सुरेश पाटील ) खानापूरला जुगारावर धाड टाकून ११ जणांवर फैजपूर येथील आयपीएस असलेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी कारवाई केल्याने तसेच गेल्या चार पाच वर्षांपूर्वी भुसावळ येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोप्पल सिंह यांनी खानापूर येथे जुगारावर धाड टाकली होती त्यामुळे संपूर्ण भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे खानापूर येथील जुगारावर धाड टाकण्याचे धाडस फक्त आयपीएस,आयएएस या अधिकाऱ्यांनाच आहेत का..? तसेच फैजपूर भागात आणि रावेर पोलीस स्टेशनला असलेल्या आतापर्यंतच्या अधिकाऱ्यांना खानापूर येथील जुगारावर धाड टाकण्याचे धाडस म्हणजे कारवाई करण्याचे अधिकार नव्हते का..? असा प्रश्न उपस्थित केला जात असून.खानापूरला फक्त खाण्याचेच उद्योग सुरू आहेत का..? अशी चर्चा सुद्धा आता झालेल्या कारवाईमुळे आपल्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात सुरू झाली आहे.[ads id="ads1"] 

याबाबत सविस्तर माहिती अशी की रावेर तालुक्यातील खानापूर चोरवड सीमेवर जुगार व सट्टाचा बाजार खुलेआम कसा सुरू राहतो आणि राहील याबाबत सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत असताना मात्र फैजपूर येथील आयपीएस महिला सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी अचानक धाड टाकून कारवाई केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. 

       खानापूर येथील स्टेशन रोडला लागून कन्हैयालाल महाराज नगरमध्ये चिखल असलेल्या रस्त्यावरून सावधपणे कोणताही गाजावाजा न करता सापळा रचून त्या सट्टा पिढीवर धाड टाकून ईश्वर रूपा बिरपन, शेख अमिन शेख सलीम वगैरे अकरा आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले त्यांच्याकडून ११ मोबाईल, ५ हजार २०० रुपयाची रोख रक्कम, सट्टा खेळाची साहित्य असा एकूण ३ लाख ९९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. [ads id="ads2"] 

        ही कारवाई झाल्याने आतापर्यंत आतापर्यंत रावेर पोलिसांनी किंवा जळगाव येथील एलसीबी पथकाने,फैजपूर येथील माजी डीवायएसपी यांनी कारवाई न केल्याने,सट्टा पत्ता जुगार चालकांकडून आतापर्यंत कारवाई न होण्यासाठी खानापूर येथे दर महिन्याला खानावळ म्हणून  काही हप्ते सुरू आहेत का..? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.खानापूर येथे ही कारवाई झाली असली तरी त्या ठिकाणी किंवा त्या गावात परिसरात पुन्हा संबंधित सट्टा,पत्ता, जुगार सुरू करतील का..? याकडे आता महाराष्ट्रासह मध्य प्रदेशाचे लक्ष वेधून आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️