रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलतर्फे करियर गायडन्स ऑन प्लेसमेंट, ट्रेनिंग अँड इंटरशिप विथ न्यू टेक्नॉलॉजी इन आयटी सेक्टर या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. [ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून मानसी पाटील, संचालिका निंजा कोडरहब व यशराज पवार, फुल स्टॅक डेव्हलपर हे उपस्थित होते. मानसी पाटील यांनी कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या लँग्वेज तसेच प्लेसमेंट व व वेगवेगळे कॉम्प्युटरचे सर्टिफिकेट कोर्सेस याबद्दल सविस्तर माहिती सांगितली तसेच यश पवार यांनी इंटरव्यू ला कसे सामोरे जावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. [ads id="ads2"]
विद्यार्थ्यानी आपले ध्येय निश्चित करून त्याच्यासाठी प्रयन्न करायला पाहिजे तेव्हा यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असे प्राचार्य साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एन. वैष्णव यांनी तर आभार डॉ. जे. पी. नेहेते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.