विवरे येथे सी.आर.पी.एफ. जवान चे ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : विवरे ता. रावेर येथील जवान सागर आधार निकम हे दि २५/९/२०२३ या दिवशी ते लष्करात भरती झाले .त्यांनी अतिशय मेहनत व जिद्दी च्या जोरावर हे यश संपादन केले.देश सेवा करण्याची आणि देशाच्या रक्षणसाठी आपला सुद्धा हातभार लागला पाहिजे अशी त्यांची ईच्छा होती.[ads id="ads1"] 

ते लष्कराचे प्रशिक्षण घेऊन आल्यावर विवरे गावात त्यांची भव्य स्वागत करण्यात आले आणि ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्प हराची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले मिरवणूक शिवाजी महाराज चौकात व बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यावर त्यांनी महामानवाना पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले.[ads id="ads2"] 

त्या वेळी विवरे बु उपसरपंच विनोद मोरे, सदस्य दीपक गाढे, विवरे खु सदस्य दीपक गाढे सामाजिक कार्यकर्ते किशोर सोपान पाटील, राहुल पाचपांडे, यांनी जवान सागर निकम याच्ये अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या त्या वेळेस जवान सागर निकम यांची आई गोदबाई निकम, वडील आधार निकम, भाऊ सम्राट निकम, सुभाष गाढे सर अविनाश बागुल सर, ज्योती गाढे, सनी गाढे सागर गाढे सौरभ गाढे मिलिंद दीपक बबन गाढे असे असंख्य मित्र मंडळी व गावकरी उपस्थित होते

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️