ग्रामपंचायत के-हाळे बु येथे शिक्षक सन्मान सोहळा साजरा


सावदा प्रतिनिधी (युसुफ शाह)

आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त केराळे बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील उर्दू व मराठी शाळेतील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे अवचित साधून सालाबाद प्रमाणे ग्रामपंचायतचे सन्माननीय सर्व सदस्य सरपंच उप सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी यावर्षीही शिक्षकांचे सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय येथे केले.[ads id="ads1"] 

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष , सरपंच सन्माननीय दिपालीताई लहासे ह्या होत्या. कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत चे सर्व सन्माननीय सदस्य मा चंद्रकांत पाटील, मा अशोक नाना पाटील, मा राजेंद्र इंगळे, मा विजय पाटील ,मा संजय चौधरी, ग्राम विकास अधिकारी मा एसटी पाटील, मा अरुण भाऊ , सर्व कर्मचारी वृंद व केरहाळे बु गावातील सर्व शिक्षक उपस्थित होते.[ads id="ads2"] 

  सरपंच ग्रामविकास अधिकारी व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते गावातील शिक्षक राजेंद्र चौधरी सर , मधुकर निळे सर , गौस खान सर, दिलीप सावळे सर, साहेबराव चौधरी सर , रफिक सर , शकील तडवी सर , वंदना गरुड मॅडम, मंदा पाटील मॅडम , जमीला तडवी मॅडम , नर्सिंग राठोड सर या सर्व सन्माननीय शिक्षकांना पुष्प , रुमाल व टोपी देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत चे सन्माननीय सदस्य राजेंद्र इंगळे साहेब यांनी केले. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक गौस खान व निळे सर यांनी मनोगत केले. मनोगत व्यक्त करताना गौसखान यांनी 

 सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य , ग्राम विकास अधिकारी, जि प , प स सदस्य, पोलीस पाटील , स्थानिक मंडळी व केर्हाळे गावातील नागरिकांचा कौतुक केला .

 शिक्षकांना सन्मानित करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️