ऐनपूर महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी” या विषयावर व्याख्यान संपन्न

 


ऐनपूर  ता.रावेर : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि द युनिक अकॅडमी,पुणे शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यासाठी “स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी” या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.[ads id="ads1"] 

व्यासपीठावर श्री नरेन्द्र पाटील, श्री. विकास गिरासे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, डॉ. सतीश वैष्णव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि सूत्रसंचलन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. विकास गिरासे , शाखा प्रमुख द युनिक अकॅडमी जळगाव, यांनी आपल्या मार्गदर्शनात राज्य व केंद्र शासना तर्फे स्पर्धा परीक्षांमार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची माहिती दिली. तसेच पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी कोणती पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे वाचली पाहिजे याबद्दल विस्तृत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप समजावून सांगितले.[ads id="ads2"] 

विद्यार्थ्याशी हितगूज करतांना त्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल जागृती निर्माण व्हावी त्यात ते यशस्वी व्हावेत यासाठी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सतीश एन. वैष्णव यांनी तर आभार डॉ. जयंत नेहेते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️